आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे: 80 टक्के भाजलेल्या सावन राठोडचा ससूनमध्ये उपचारादरम्यान अखेर मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- पुण्यातील मध्यवस्तीतील कसबा पेठ परिसरातील माणिक चौकातील एका वाड्यात दुचाकीची बॅटरी चोरत असल्याच्या संशयावरून पेटवून दिलेल्या 17 वर्षीय सावन राठोडचा अखेर आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. सावनला प्रथम पेट्रोल पाजले व नंतर अंकावर टाकून पेटविल्याची घटना बुधवारी दुपारी घडली होती. या घटनेत सावन 80 टक्के भाजल्याने त्याची प्रकृती गंभीर होती. त्याच्यावर ससून रूग्णालयात उपचार सुरु होते मात्र आज सकाळी 11 च्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.
कसबा पेठेतील माणिक चौकाजवळील एका वाड्याच्या परिसरात भंगार गोळा करण्यासाठी सावन धर्मा राठोड गेला होता. त्यावेळी तो एका गाड्याच्या आडोशाला उभा होता. या वाड्यातील दुचाकी गाड्याच्या बॅटरीची चोरी झाली होती. त्यामुळे तो हाच चोर असावा असे समजून इबूर झुबेर आणि इम्रान नावाच्या तरूणांनी सावनला पकडले. सतत चो-या होण्यामागे व गाड्यांचे पार्टस चोरण्यामागे हाच युवक असावा म्हणत या दोघांनी सावनला बेदम मारहाण केली. त्यावेळी आपण चोर नसल्याचे ओरडून सांगूनही हे तरूण सावनला मारत राहिले. त्याचवेळी एकाने पेट्रोल काढून प्रथम त्याला पाजले व नंतर त्याच्या अंगावर टाकून पेटवून दिले. या घटनेत तो 80 टक्के भाजला होता. त्यानंतर त्याला ससूनमध्ये दाखल केले होते.
या प्रकरणी फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी इब्राहिम शेख , इम्रान तांबाेळी (वय 28) जुबेर तांबाेळी (26) या अाराेपींना फरासखाना पाेलिसांनी अटक केली अाहे.
बातम्या आणखी आहेत...