आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'दगडूशेठ\'च्या देखाव्याच्या कळसाचा काही भाग कोसळल्याने कामगार जखमी; व्हिडिओ व्हायरल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाच्या देखाव्याच्या कळसाचा काही भाग काढताना एक कामगार तोल जाऊन खाली पडल्याने गंभीररित्या जखमी झाला आहे. याचा धक्का दुसऱ्या एका कामगाराला लागल्याने आणखी एक जण जखमी झाला आहे. मध्यरात्री 3 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. फरासखाना पोलिसांनी याबाबत माहिती दिली. या घटनेचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाच्या मुख्य मंडपाच्या एका बाजूचा कळस काढताना हा प्रकार घडला. दगडूशेठ गणपतीच्या मुख्य उत्सव मंडपाच्या देखाव्यात तीन कळस आहेत. त्यातील दत्त मंदिराच्या बाजूकडील कळस विसर्जन मिरवणुकीत वापण्यासाठी काढण्याचे काम सुरु होते. पहाटेच्या सुमारास राम जाधव (वय 22) हा कामगार क्रेनच्या साहायाने कळस काढत होता. मात्र, काही समजण्याच्या आत हा कामगार मंडपाच्या बाजूच्या पत्र्यावर पडला. त्यानंतर कोलांटी घेत तो खाली रस्त्यावर पडला.

या कामगाराचा आणखी एकाला धक्का लागल्याने तो ही गंभीररित्या जखमी झाला आहे. मात्र, दुसऱ्या जखमीचे नाव कळू शकलेले नाही. या घटनेनंतर दोघांनाही तत्काळ रुबी हॉल रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोघेही अत्यवस्थ असल्याचे सांगण्यात येत आहे.
 
पुढील स्लाईडवर पाहा फोटो आणि व्हिडिओ
बातम्या आणखी आहेत...