आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्जबाजारी तरुणाने दागिने लुटून महिलेचा खून

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - व्हिडिओ गेमवर अडीच लाख रुपये उधळल्यामुळे कर्जबाजारी झालेल्या तरुणाने वृद्धेचे दागिने चोरून तिचा खून केल्याची घटना सांगली जिल्ह्यात उघडकीस आली आहे.


बाळकाबाई कोकरे (वय 60) या महिलेचा मृतदेह 29 एप्रिलला रेठरे धरण येथील शेतात अर्धवट पुरलेल्या स्थितीत आढळला होता. पोलिसांनी याप्रकरणी संशयावरून राजेंद्र हिंदुराव शिंगाडे याला ताब्यात घेतले. अधिक चौकशी केली असता त्याने खूनाची कबुली दिली. शिंगाडे हा बेकार आहे. त्याने गेल्या वर्षभरात जुगारात अडीच लाख रुपये गमावले. हे पैसे मिळवण्यासाठी त्याने बाळकाबाई यांना रस्त्यात अडवून त्यांच्या गळ्यातील साडे चार तोळे सोने काढून घेतले व त्यांचा गळा दाबून खून केला आणि मृतदेह शेतात पुरला.