आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धावत्या रेल्वेतील स्टंटबाजी जीवावरच बेतणार होती पण पायावर निभावलं!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धावत्या रेल्वेत स्टंटबाजी करणे त्याच्या जीवावरच बेतणार होतं पण नशिबानं दोन्ही पायावर निभावलं आहे. - Divya Marathi
धावत्या रेल्वेत स्टंटबाजी करणे त्याच्या जीवावरच बेतणार होतं पण नशिबानं दोन्ही पायावर निभावलं आहे.
पुणे- लोणावळा-पुणे या लोकल रेल्वेमध्ये स्टंटबाजी करणारा एक 23 वर्षीय तरुण बालंबाल बचावला आहे. धावत्या रेल्वेत स्टंटबाजी करणे त्याच्या जीवावरच बेतणार होतं पण नशिबानं दोन्ही पायावर निभावलं असेच म्हणावे लागेल. पिंपरी-चिंचवडमधील देहू रोड येथे ही घटना घडली आहे.
 
सचिन सत्यवान डुलगज (वय 23, देहूरोड) असे स्टंटबाजीत बचावलेल्या तरूणाचे नाव आहे. त्याच्यावर सध्या पुण्यातील ससून रूग्णालयात उपचार सुरु आहेत. सचिनचे दोन्ही पाय गुडघ्यापासून तुटले आहेत. त्यामुळे त्याला आता उर्वरित आयुष्यात कधीच चालता येणार नाही.
 
देहूरोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसापूर्वी सचिन देहूरोडहून पुण्याकडे जात होता. त्याचवेळी तो धावत्या रेल्वेत दरवाज्याजवळ स्टंटबाजी करू लागला. स्टंटबाजीच्या नादात त्या बाहेर फेकला गेला. मात्र, वेगामुळे सचिन फिरला गेला व बरोबर त्याचे दोन्ही पाय रूळावर गेले. त्याचवेळी मागील डब्ब्यांनी त्याच्या पायाचा भुगा केला. त्यानंतर सचिन 15 मिनिटे तेथेच रूळावर पडून राहिला काही वेळातच बेशुद्ध झाला. नागरिकांच्या लक्षात ही बाब येताच त्याला रूळावर बाहेरून काढले. कारण काही वेळात तेथून एक्सप्रेस रेल्वे गाडी जाणार होती. त्यानंतर त्याला पुण्यातील ससून रूग्णालयात दाखल करण्यात आले.
 
मागच्याच आठवड्यात देहूरोड परिसरातील कामशेत रेल्वे स्टेशन्सवरील एका तरूणाच्या स्टंटचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओत एक तरूण रेल्वे गाडी रूळावर रेल्वे येण्यापूर्वी बसलेला दिसतो तसेच रेल्वे गाडी जवळ येताच तो झोपून जातो. काही सेकंदात  त्यांच्या अंगावरून रेल्वे निघून जाते. मात्र, या तरूणाला काहीच झालेले नसते. रेल्वे पुढे जाताच तो पुन्हा रेल्वे रूळावर बसतो व काहीच घडले नाही, अशा थाटात वावरतो. त्यानंतर तो तरूण निवांत व सहज तेथून उभा राहून बाहेर येतो. या सर्व घटनेचे व स्टंटबाजीचे मोबाईलमध्ये त्याचे मित्र रिकॉर्डिग करतात. तरूणांनी रेल्वे रूळावर व धावत्या रेल्वेत स्टंटबाजी करू नका असे पोलिसांनी आवाहन केले आहे तरीही काही टवाळखोर तरूण स्टंटबाजी करताना दिसत आहेत.
 
पुढे पाहा, कामशेत रेल्वे स्थानकावर धावत्या रेल्वेखाली तरूणाची स्टंटबाजीची छायाचित्रे व VIDEO
 
बातम्या आणखी आहेत...