आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकीय वैमनस्यातून पुण्यात गोळ्या घालून एकाची हत्या

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - राजकीय वैमनस्यातून पुण्यातील पाषाण येथे एका गटाने दुस-या गटावर गोळीबार केल्याने एक ठार, तर दोन जण जखमी झाल्याची घटना शुक्रवारी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. प्रतीक रामचंद्र निम्हण (24) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी चतुशृंगी पोलिस चौकीत तुषार आणि चेतन निम्हण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कीर्ती रामदास काळे यांनी याबाबत तक्रार दिली आहे.

शुक्रवारी रात्री प्रतीक निम्हण हा काळे यांच्या इमारतीजवळ मित्रांसोबत गप्पा मारत बसला होता. त्या वेळी तुषार आणि चेतन निम्हण तेथे मोटारसायकलवरून आले व त्यांनी प्रतीकवर गोळ्या झाडल्या. तसेच त्यांच्यासोबत आलेल्या सागर निम्हण, राहुल गुंड, रवी शिर्के, अभिजित घाडगे यांनी प्रतीकचे मित्र लक्ष्मण माने, देवा माने, राहुल सरोदे यांनाही लाकडी दांडक्याने मारहाण केली. घटनेनंतर सर्व जण फरार झाले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.