आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दौंड तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ; हातात धारदार शस्त्र घेत फिरणारे चोरटे CCTV त कैद

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवत (ता दौंड) येथे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेले चोरटे. - Divya Marathi
यवत (ता दौंड) येथे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेले चोरटे.

पुणे- दौंड तालुक्यात मोठ्या प्रमाणावर चोरीचे प्रमाण वाढले आहे. गेल्या काही दिवसांपासून चोरांनी हैदोस घातला आहे. त्यामुळे दौंड तालुक्यातील गावांमधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. काल रात्री चोरट्यानी दुचाकी आणि चारचाकी गाड्या चोरल्या मात्र नागरिकांच्या प्रसंगवधानाने हे चोरट्यानी गाड्या तेथेच ठेवल्या आणि धूम ठोकली. त्यांच्या हातात धारदार शस्त्र होती.

 

गेल्या काही दिवसांपासून दौंड तालुक्यात चोऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वीच दौंड तालुक्यातील केडगाव येथे चोरट्यांच्या एका टोळीने भरदिवसा गाडीची काच फोडून सुमारे साडेतीन लाखाचा ऐवज लंपास केला होता. त्यानंतर आठ दिवसात सोनाराचे दुकान फोडण्यात आले होते तर काल रात्री चोरट्यांच्या टोळीने यवत परिसरात कोयते आणि विविध हत्यारे हातामध्ये घेऊन घरे फोडण्याचा आणि गाड्या चोरून नेण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र यावेळी नागरिकांची चाहूल लागल्याने या चोरट्यांनी चोरलेल्या गाड्या तेथेच सोडून पळ काढला. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून यामुळे यवत परिसरात भीतीचे  वातावरण निर्माण झाले आहे.

 

पुढील स्लाईडवर पाहा व्हिडिओ

बातम्या आणखी आहेत...