आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुणे: सत्तेत राहून जनतेच्या प्रश्नांवर शिवसेना सरकारशी लढत राहणार : अादित्य ठाकरे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- दिवसेंदिवस शिक्षण महागत चालले असून विद्यार्थ्यांना अभ्यासाकरिता विविध साधने उपलब्ध हाेऊ शकत नाहीत. इंटरनेटच्या युगात विद्यार्थ्यांना अाधुनिक शिक्षण प्रणालीकडे नेण्याकरिता मुंबर्इतील महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना टॅब वाटप करण्यात अाले. राज्यभरातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना टॅब वाटप करण्यात यावे याकरिताची याेजना पंतप्रधान, मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री यांना भेटून समजावून सांगण्यात अाली त्यांना ती अावडली. मात्र, सरकारच्या कार्यवाहीची वाट पाहता शिवसेनेने पुढाकार घेत याेजना राबवली. जनतेच्या प्रश्नांसाठी यापुढील काळातही शिवसेना सत्तेत राहून रडण्यापेक्षा लढत राहील, असे मत युवा सेनाप्रमुख अादित्य ठाकरे यांनी शुक्रवारी व्यक्त केले अाहे.   

 

शिवसेना अाणि युवा सेनेतर्फे 'शिवसेना टाॅप स्काेअर' या संकेतस्थळाच्या लाेकार्पण कार्यक्रमात ते बाेलत हाेते. ठाकरे म्हणाले, शिवसेना नेहमी लाेकांसाेबत असून नागरिकांच्या समस्यांवर वेळप्रसंगी सरकारविराेधात भूमिका घेते. विद्यार्थी निवडणुका, शिक्षकांवर अशैक्षणिक कामांचा बाेजा, मुंबर्इ विद्यापीठातील गाेंधळ या महत्त्वाच्या प्रश्नांची उकल करण्याकरिता सर्वांनी एकत्र येणे गरजेचे अाहे. शहरी भागासाेबतच ग्रामीण अादिवासी विद्यार्थ्यांना अाधुनिक पद्धतीने दर्जेदार शिक्षण मिळावे याकरिता शिवसेना सामाजिक जबाबदारीने शिक्षणाच्या प्रश्नावर काम करत अाहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण, शिक्षण पद्धती अाणि अभ्यासक्रमांची पुनर्बांधणी यासाेबतच समाजातील सर्व घटकांपर्यंत शिक्षण पाेहोचावे याकरिता प्रयत्नशील राहिले पाहिजे. सध्या विद्यार्थ्यांना राईट टु एज्युकेशनपेक्षा राईट टु क्वालिटी एज्युकेशनची खरी गरज अाहे. शिवसेना टाॅप स्काेअर या संकेतस्थळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना माेफत शिक्षण मिळणार अाहे. या संकेतस्थळावर अाॅनलाइन डिक्शनरी, प्रश्नपेढी मराठी इंग्रजी भाषेत उपलब्ध करून देण्यात अाली अाहे. 

बातम्या आणखी आहेत...