आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात उस्ताद झाकीर हुसेन यांनी तबलावादनातून कैद्यांना दाखवला जिवनाचा खरा मार्ग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- जगविख्यात तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांच्या बाेटांची थाप तबल्यावर पडताच निघणारे सुरेल वादन रसिकांवर माेहिनी पाडते. पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहात शुक्रवारी उस्तादजींनी अप्रतिम तबलावादन करत ट्रेनच्या गतीप्रमाणे वाढणारे तबल्याचे बाेल, डमरू व शंखाच्या एकत्रित अावाजाने कैद्यांसाेबत अधिकाऱ्यांनाही मंत्रमुग्ध केले.

भाेई प्रतिष्ठान, महाराष्ट्र कारागृह प्रशासन अाणि अादर्श मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने कैद्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात अाणण्यासाठी ‘प्रेरणापथ’ हा उपक्रम राज्यातील कारागृहात राबवण्यात येत आहे. त्याअंतर्गत उस्तादजींनी कैद्यांशी संवाद साधला.
 
या वेळी विशेष पाेलिस महानिरीक्षक सी. एच. वाकडे, कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे, पुणे न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश पृथ्वीराज चव्हाण, कारागृह अधीक्षक यू. टी. पवार, अायाेजक मिलिंद भाेई, उदय जगताप उपस्थित हाेते.  
 
झाकीर हुसेन म्हणाले, कारागृहात अाल्यानंतर जीवन संपले, अशी भावना बाळगणे चुकीचे आहे. जीवनात केलेल्या चुका पुन्हा होणार नाहीत याची काळजी घेऊन नव्या दिशेला जाण्याचा विचार करणे महत्त्वाचे अाहे. तुमच्याशी मला पुन्हा भेटण्याचा योग येवो, असेही हुसेन यांनी कैद्यांशी संवाद साधताना म्हटले.
 
उपस्थित  कैद्यांत अनेक जण लेखक, गायक, संगीतकार, वादक असून त्यांनी अापली कला जपावी. शास्त्रीय संगीत सामान्य नागरिकांना समजणे अवघड असल्याने ते साेप्या शैलीत सांगितल्यास लवकर समजेल. ‘प्रेरणापथ’ संकल्पना अादर्शवत असून त्याचा फायदा कैद्यांनी व्हावा, असेही ते म्हणाले.

वर्दीतील कलाकाराला शाबासकी:
झाकीर हुसेन यांनी मैफल सुरू करण्यापूर्वी अधिकारी, कैद्यांत कोणी कलाकार अाहेत का? अशी विचारणा केली. त्यानंतर तुरुंगाधिकारी तेजश्री पाेवार यांनी विविध बंदिशी सादर करत उस्तादजींची शब्बासकी मिळवली.
 
पाेवार म्हणाल्या, खुद्द झाकीर हुसेन यांच्यासमाेर तबलावादन करणे हा अनुभव शब्दांत व्यक्त करता येणारा नाही. अाज माझ्या कलेचे सार्थक झाले. मी मूळ काेल्हापूरची. मला तबलावादनाची अावड आहे. काेल्हापुरात उस्तादजींच्या कार्यक्रमाची तिकिटे मिळाली नव्हती. मात्र, अाज प्रत्यक्षात त्यांच्यासमाेर तबलावादनाची संधी मिळाल्याने मी खूप अानंदी अाहे.
बातम्या आणखी आहेत...