आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्याच्या येरवडा मध्यवर्ती कारागृहात अाज ‘वाह उस्ताद’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - जीवनाच्या विविध टप्प्यांवर चुका केल्याने कारागृहाच्या भिंतीआड कैद झालेले येरवडा मध्यवर्ती कारागृहातील कैदी शुक्रवारी प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांची भेट घेतील. या वेळी हुसेन कैद्यांशी संवाद साधणार आहेत.  
  
येरवडा मध्यवर्ती कारागृह प्रशासनाच्या वतीने गेल्या वर्षापासून कैद्यांसाठी ‘प्रेरणा’ उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या अंतर्गत विविध क्षेत्रात लक्षणीय कार्य केलेल्या आणि इतरांसाठी आदर्श बनलेल्या मान्यवरांना आमंत्रित केले जाते. त्यांचा कैद्यांशी संवाद घडवला जातो. आजवर ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर, योगगुरू रामदेवबाबा अशा मान्यवरांनी ‘प्रेरणा’ उपक्रमांतर्गत येरवडा कारागृहाला भेट दिली आहे. शुक्रवारी दुपारी एक वाजता झाकीर हुसेन येरवडा कारागृहाला भेट देणार आहेत. कैद्यांशी ते कोणत्या भाषेत संवाद साधतात, हा औत्सुक्याचा विषय असेल.  
 
 
बातम्या आणखी आहेत...