Home | Maharashtra | Vidarva | Akola | 40 couples get divorce every year in akola

दरवर्षी 40 संसारांचा अर्ध्‍यावरती मोडतो डाव! पालकांचा हस्‍तक्षेत ठारतोय घातक

प्रबोध देशपांडे | Update - Jul 21, 2013, 11:06 AM IST

अकोल्‍यात 453 प्रकरणे कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी प्रलंबित आहेत.

 • 40 couples get divorce every year in akola

  अकोला- वेळेअभावी पती-पत्नीतला संवाद तुटल्याने ताण वाढतच चालला आहे. त्यामुळे संसाररूपी वेलीला घटस्फोटाचे ग्रहण लागले असून, वर्षाकाठी अकोला शहरातून 40 संसार अध्र्यावरती मोडत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याशिवाय 453 प्रकरणे कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी प्रलंबित आहेत. यावर्षीसुद्धा 12 जुलैपर्यंत 297 प्रकरणे दाखल झाली आहेत.

  अकोला शहरातील कौटुंबिक वादाचे प्रलंबित प्रकरणो निकाली काढण्यासाठी 20 डिसेंबर 2009 मध्ये स्वतंत्र कौटुंबिक न्यायालयाची स्थापना करण्यात आली. कौटुंबिक न्यायालयाच्या स्थापनेनंतर 1,209 प्रकरणो या न्यायालयाकडे वर्ग करण्यात आली. 2009 ते 2012 पर्यंत कौटुंबिक न्यायालयामध्ये दरवर्षी सरासरी 400 प्रकरणांची भर पडली. सद्य:स्थितीत अकोला कौटुंबिक न्यायालयाकडे दिवाणी 173, खावटीचे पैसे मिळण्यासाठीचे 280 असे एकूण 453 प्रकरणे प्रलंबित आहेत. दरवर्षी सरासरी 40 घटस्फोट अकोल्याच्या कौटुंबिक न्यायालयात होतात.

  छोटी कुटुंब कारणीभूत

  एकत्र कुटुंब पद्धतीची जागा आता छोटी कुटुंब घेऊ लागल्याचे ढळढळीतपणे दिसून येऊ लागले आहे. विभक्त छोट्या कुटुंबास बहुतांशी महिलाच जबाबदार आहेत. भारतातल्या तब्बल 70 टक्के घरांमध्ये एकाच जोडप्याचा संसार आहे. विशेष म्हणजे छोट्या कुटुंबांची ही संकल्पना फक्त शहरांपुरतीच र्मयादित राहिलेली नाही, तर नीमशहरी आणि ग्रामीण लोकवस्तीमध्येही ती चांगलीच झिरपली आहे. छोटी कुटुंब पती-पत्नीमध्ये वाद होऊन संसार मोडण्यासाठी कारणीभूत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

  पालकांचा हस्तक्षेप घातक

  आपल्या मुलांच्या संसारात पालक करत असलेला हस्तक्षेप घातक असल्याचे कौटुंबिक न्यायालयाच्या प्रकरणांवरून स्पष्ट झाले. अकोला कौटुंबिक न्यायालयातील बहुतांश प्रकरणात पालकांच्या हस्तक्षेपामुळेच घटस्फोट घडल्याचे समोर आले आहे.

Trending