Home | Maharashtra | Vidarva | Akola | 72 lacs fine recover from sand mafia

वाळू माफियांकडून 72 लाखांवर दंड वसूल

शंतनू राऊत | Update - Jul 17, 2013, 09:39 AM IST

जिल्ह्यात सातही तालुक्यांतील रेती घाटाचे लिलाव दोन ते तीन महिने उशिरा करण्यात आले होते. याचा फायदा जिल्ह्यातील वाळू माफियांना चांगलाच झाला आहे.

  • 72 lacs fine recover from sand mafia

    अकोला- जिल्ह्यातील वाळू माफियाकंडून महसूल विभागाच्या खनिकर्म विभागाने 2012 व मार्च 2013 अखेरीस सुमारे 72 लाखांवर दंड वसूल केला आहे. याप्रकरणी तब्बल 99 वाळू माफियांवर पोलिस कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती खनिकर्म विभागाने दिली आहे.

    जिल्ह्यात सातही तालुक्यांतील रेती घाटाचे लिलाव दोन ते तीन महिने उशिरा करण्यात आले होते. याचा फायदा जिल्ह्यातील वाळू माफियांना चांगलाच झाला आहे. रेती घाटाचे लिलाव झाल्यानंतरही जिल्ह्यामध्ये मोठय़ा प्रमाणात अवैध उत्खनन करण्यात आले. अनेकदा पोलिस कारवाई करण्यात आली आहे. तरीही जिल्ह्यात अवैध उत्खनन करण्याचा सपाटा वाळू माफियांनी लावला होता. आजही पावसाळ्यामध्ये उत्खनन सुरूच आहे.

    खनिकर्म विभागाने 2012 मार्च व 2013 मार्च अखेरीस केलेली दंडाची रक्कम वसूल आणि केलेली कारवाई चांगली आहे. संबंधित परिसरात अवैध रेतीचे उत्खनन होत असेल नागरिकांनी तहसील आणि खनिकर्म विभागाशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वाळूचे अवैध उत्खनन होत असल्यास संबंधित आरोपींवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल. सामान्य नागरिकांच्या तक्रारीची दखल घेऊ. मनीष गायकवाड खनिकर्म अधिकारी, अकोला.

Trending