आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Akola
  • राज्यातील ५ हजारांवर शाळांतून जादूटोणाविरोधी कायद्याचे प्रबोधन

राज्यातील ५ हजारांवर शाळांतून जादूटोणाविरोधी कायद्याचे प्रबोधन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - जादूटोणाविरोधी कायदा जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी अनेक उपक्रम राबवण्यात येत आहे. शाळा, विद्यालयांमधून ५ हजारांवर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक प्रा. श्याम मानव यांनी रविवारी दिली.

या कायद्याच्या जनजागृतीसाठी सामाजिक न्याय विभागाच्या सौजन्याने अनेक उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. त्याअंतर्गत राज्यभरात ३५ जिल्ह्यांमध्ये "वैज्ञानिक दृष्टिकोन व जादूटोणाविरोधी कायदा' विषयावर व्याख्याने झाली. त्यानंतर या कायद्याची अंमलबजावणी करणारे सर्व पोलिस निरीक्षक व त्यावरील अधिकार्‍यांचे प्रशिक्षण वर्ग कोकण नाशिक विभागात पूर्ण झाले आहेत. आता विदर्भातील प्रशिक्षण वर्गांना प्रारंभ झाला आहे.’
बातम्या आणखी आहेत...