आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राज्य सरकारने निलंबितांचे दहा लाख रुपये द्यावे; प्रशासनाची मागणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- मागील अनेक वर्षांपासून विविध कारणांनी निलंबित असलेल्या कर्मचार्‍यांच्या वेतनाचा पैसा शासनाने द्यावा, अशी मागणी महापालिकेने केली.

निलंबित माजी आयुक्त जी. एन. कुर्वे हे जुलै महिन्यात निवृत्त झाले. तसेच उपायुक्त उमेश कोठीकर हे एका प्रकरणात निलंबित असून, त्यांना 75 टक्के पगार द्यावा लागत आहे. या दोघांवर सुमारे 60 हजार रुपयांचा मासिक खर्च गेल्या महिन्यापर्यंत होता. निलंबन काळात या दोघांवर वेतनापोटी सुमारे दहा लाख रुपये खर्च झाला. त्यामुळे हे पैसे राज्य शासनाने द्यावे, अशी मागणी महापालिकेने केली आहे. तसेच सहायक उपायुक्त पदावर असलेल्या माधुरी मडावी या रजेवर असून, त्या अद्याप रुजू झाल्या नाहीत. आनंद सोनोने हे उपायुक्त पदावर रुजू झाले नसून, ते निलंबित आहेत.

हे दोघे महापालिकेत कार्यरत नाहीत. पण, ज्या दिवशी हे महापालिकेत रुजू होतील त्या वेळी त्यांना या सर्व कालावधीचा पगार द्यावा लागेल. महापालिकेची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने शासनाने या सर्वांच्या पगाराचे पैसे त्वरित द्यावे, अशी मागणी महापालिकेने राज्य शासनाकडे केली आहे.