आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाराशे शेतकरी दुष्काळी मदतीपासून आहेत वंचित

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मानोरा - संकटामुळे शेतकं-याचे अतोनात नुकसान झाले. शेतात लावलेली पिके निघाल्याने नुकसान अधिक झाले. शेतकं-यांवर उदभवलेले संकट ध्यानात घेऊन शासनाने कोरडवाहू शेतकं-यांना हेक्टरी ४५०० रुपये तर बागायतदार शेतकं-यांना हेक्टरी हजार रुपये अनुदान जाहीर केले. मात्र, मानोरा तालुक्यातील मंडळातील ५२ गावातील १२१६ शेतकंना ५९ लाख २९ हजार ३८९ रुपये अद्याप मिळाले नाही. अनुदानाची रक्कम शेतकंच्या खात्यात कधी जमा होणार, असा सवाल शेतकरी विचारत आहेत.

गेल्यावर्षी शेतक-यांने पेरणी केली परंतु त्यांना उत्पन्नच झाले नाही. त्यामुळे शासनाने पॅकेज जाहीर केले. त्याचा फायदा तालुक्यातील शेतकं-यांना अजूनही झाला नाही. यंदा शेतकंना पैशाची गरज आहे. पेरणीचे दिवस असल्याने पैशाची आवश्यकता असताना शेतकं-यांच्या तोंडाला पाने पुसली जात असल्याने शेतकं-यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. वेळेवर नाही तर केव्हा पैसे देणार. आमच्या तेरवीची वाट पाहता का, अशी संतप्त प्रतिक्रिया मन्साराम काशीराम राठोड यांच्यासह काही शेतकं-यांनी व्यक्त केली. मदतीच्या रकमेसाठी शेतकरी तहसील कार्यालयाच्या पाय झिजवत आहेत. मात्र, अधिकारी, कर्मचारी त्यांना उडावउडवीची उत्तरे देऊन शासनाकडे प्रस्ताव पाठवल्याचे सांगतात. शेतकं-यांच्या प्रश्नाकडे अन्यवेळी आरडाओरड करणारे नेते, पुढारी, लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत असल्याचा शेतकं-यांचा आरोप आहे. तलाठ्यांनी शेतकं-यांचे खाते क्रमांक चुकीचे घेतले. त्यांच्याकडे खाते क्रमांक असूनही दिरंगाई केल्याने शेतकरी अडचणीत आले. शेतकंसाठीलढा उभारू : शेतकं-यांचेखाते क्रमांक असूनही संबंधित तलाठ्यांनी जाणुनबुजून वेळकाढूपणआ केल्याने शेतकं-यांना दुष्काळी मदतीपासून वंचित राहावे लागले. त्यामुळे त्यांच्या खात्यात रक्कम जमा होऊ शकली नाही. असे अधिकारी, कर्मचारी यांच्याविरुद्ध कार्यवाही व्हावी. त्यांना वेळीच न्याय दिला नाही तर आंदोलन छेडण्याचा इशारा वीज मंडळाचे माजी सदस्य अनिल राठोड, जि. प. चे माजी अध्यक्ष अरविंद इंगोले, पं. स. चे माजी सभापती राजेश नेमाने आदींनी दिला आहे.

गावाचे नाव खातेदार संख्या एकूण रक्कम
- वडगाव५९ २,९३,८५०
- आमकिन्ही ५२ २,६३,३७०
- शेंदोना ६६ २,६२,७६०
- ज्योतीबानगर ६७ २,९४,६२५
- वसंतनगर ३० १,२८,७००
- देऊरवाडी ३५,१००
- उमरी बु. १६ ७९,७८५
- उमरी खु. १५ ८७,९६०
- पिंपळशेडा ३८,९२५
- पोहरादेवी १८ ८०,३२५
- कुपटा २२ १,२१,६५०
- एकलारा ११ ८०,२५०
- धानोरा खु. १४ ६१,४२५
- लोहारा २२ १,०२,५२८
- सावरगांव १५ ६७०५०
- उमरदरी ५४ २, ७३, ७३५
- कमळापूर १६ ८६,६२५
- शेंदूरजना ०१ ४५००
- रुई १६ ८३,१२५
- गोस्ता ३८ १,८६,४३५
- फुलउमरी १४७ ६,५५,७१०
- सोमेश्वर नगर ४० १,७७,४४५
- रतनवाडी ०७ ३२,७२५
- पाळोदी ४२ २,३१,३००
- रणजितनगर १२ ६०,८५०
- ढोणी १९ ८८,५२५
- उज्ज्वलनगर०३ ९,१००
- खांबाळा ०७ ३५,५५०
- भिलडोंगर २५ १,७१,५००
- हिवरा खु. १२ ५५,५७५
- मेंद्रा २४ १,१५,२००
- इगलवाडी ३९ २,०६,५५०
- वटफळ १० ४९,५००
- मानोरा ०८ २९,५७५
- वाटोद २५ १,३२,३००
- विठोली २३ १,०८,९००
- सोमनाथनगर ०४ १६,७८५
- सोमठाणा ०५ १८,१३५
- कारखेडा १७ ७३,८००
- चिखली ०५ २४,२१०
- कोंडोली ०९ ४९,८००
- जवळा खु. ०६ ३२,४००
- गुंडी ०२ ९,०००
- अभईखेडा ०४ २२,०५०
- धामणी ०३ १२,६००
- गिर्डा २७ १,३६,९८१
- वार्डा ०२ ९,०००
- खेर्डा ७१ ३,८६,७९५
- खापरदरी २९ १,२४,६०५
- विळेगाव १८ ९०,२२५
- गिराट २४ १,१९,०२५
- शेंदुरजना ०१ ४,९५०