आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

36 तासांनंतर मिळाले 12 माकडांना जीवदान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यात असलेल्या चांदी प्रकल्पातील झाडांवर चढलेली माकडे अचानकपणे आलेल्या पावसामुळे तब्बल दीड दिवस खालीच उतरू शकली नाहीत. अखेर शुक्रवारी (2 ऑगस्ट) शासकीय यंत्रणा आणि प्राणिमित्र संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांनी बारा माकडांना पाण्यातून सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. चांदी प्रकल्पात दोन दिवसांपूर्वी पाणी नव्हते. या भागात असलेल्या झाडांवर नेहमीच माकडे बसतात.

नेहमीप्रमाणे 31 जुलैला झाडावर चढलेले माकड खाली उतरू शकले नाहीत. कारण 31 जुलैला रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे प्रकल्पात पाणीच पाणी झाले. 12 माकड झाडांवर असल्याची माहिती प्रशासनाला आज 2 ऑगस्टला मिळाली.

आज सकाळी 9 वाजतापासून माकडांना वाचवण्यासाठी रेस्क्यू पथकाचे बचाव कार्य सुरू झाले. दोन होडींच्या मदतीने माकडांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू झाले. मात्र, माकड सहजासहजी होडीत येत नव्हते. त्या वेळी त्यांच्यासाठी केळी आणि बिस्किट होडीत टाकण्यात आले. अखेर तीन तासांनंतर माकडांना सहीसलामत बाहेर काढले. या वेळी नांदगाव खंडेश्वरचे तहसीलदार अनिरुद्ध बडगे, वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी, पोलिस, जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे बचाव पथक तसेच कार्स संघटनेचे राघवेंद्र नांदे, चेतन भारती, शुभम गिरी, संजोग खोटे, अक्षय देशमुख यांच्यासह अन्य कार्यकर्ते हजर होते.

वृक्ष तोडावाच लागला
बारा माकडांपैकी दोन माकड उड्या मारत एका वृक्षावर गेले. त्या वृक्षावरून माकडांना खाली येणे शक्य नव्हते, त्या वेळी नाइलाजास्तव एक वृक्ष तोडून त्या दोन्ही माकडांना जीवदान देण्यात आले.

माकडांना खाण्यासाठी मिळाले नाही तर ते कोणत्याही झाडांचा पाला खाऊन आपली भूक भागवतात. त्याच पाल्याच्या माध्यमातून ते पाण्याचीसुद्धा गरज पूर्ण करतात. किमान एक आठवडा माकडांना अन्न किंवा पाणी मिळाले नाही तरी ते जगू शकतात. प्रा. डॉ. गणेश वानखेडे, प्राणिशास्त्रज्ञ