आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • 13 Traffic Signal Will Begin Circles At Akola, Divya Marathi

13 चौकांत सुरू होणार ‘सिग्नल’ , महापालिका लवकरच निविदा बोलावणार

8 वर्षांपूर्वी
 • कॉपी लिंक
अकोला - गजबजलेले रस्ते व विस्कळीत वाहतूक हे चित्र काही महिन्यांनंतर शहरात राहणार नाही. शहराच्या प्रमुख 13 चौकांत ‘सिग्नल व्यवस्था’ सुरू होत आहे. यासाठी महापालिका प्रशासन लवकरच निविदा बोलावणार आहे.
विस्कळीत वाहतुकीला मार्गावर आणण्यासाठी रहदारी पोलिसांनी फारसा पुढाकार घेतला नाही. परंतु, महापालिका प्रशासनाने अधून-मधून ‘सिग्नल व्यवस्था’ सुरू करण्याचा प्रयत्न केला. परंतु, हा प्रयत्न यशस्वी झाला नाही. मात्र, आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी शासनाच्या निधीतून ‘सिग्नल व्यवस्था’ सुरळीत करण्यासाठी पदाधिकार्‍यांकडून निधी खेचून आणण्यात यश मिळवले. ‘सिग्नल व्यवस्था’ सुरू करण्यासाठी निधीला महासभेने मंजुरीही दिली. त्यामुळे आता ‘सिग्नल व्यवस्था’ सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला. या अनुषंगाने प्रशासन कामाला लागले आहे. दरम्यान, शहरातील गांधी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृह चौक तसेच सावतराम गल्ली चौक या तिन्ही चौकांत वारंवार वाहतूक जाम होते. विशेष म्हणजे, या चौकात रहदारी पोलिसही फारसे कर्तव्यावर नसतात. त्यामुळे या चौकातही ‘सिग्नल व्यवस्था’ सुरू करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
निविदा बोलावणार
प्रशासनाच्या वतीने लवकरच निविदा बोलावण्यात येणार आहे. याच वेळी आमदार निधीतून उभारण्यात येणार्‍या चौकातील सिग्नलच्या कामाच्या निविदाही बोलावल्या जातील.’’ अमोल डोईफोडे, विद्युत विभाग प्रमुख, मनपा.
आमदार गोवर्धन शर्मांचे योगदान
आमदार गोवर्धन शर्मा यांनी शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी, या हेतूने स्थानिक विकास निधी अंतर्गत सुंदराबाई खंडेलवाल चौक, मदनलाल धिंग्रा चौक व अशोक वाटिका चौकात सिग्नल व्यवस्था सुरू करण्यासाठी 16 लाख 32 हजारांचा निधी मनपाला दिला आहे. त्यामुळे इतर चौकांसोबत या चौकातही ‘सिग्नल व्यवस्था’ सुरू होत आहे. त्याचा फायदा विस्कळीत वाहतुकीला मार्गावर आणण्यासाठी होईल.
13 चौकांत सुरू होणार ‘सिग्नल
 • वाशीम बायपास वळण चौक
 • जेल चौक
 • शहर कोतवाली चौक
 • मुख्य पोस्ट ऑफिस
 • नेहरू पार्क चौक
 • सिव्हिल लाइन चौक
 • रतनलाल प्लॉट चौक
 • हुतात्मा स्मारक चौक
 • अग्रसेन चौक