आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलाचा शौचालयाच्या टाक्यामध्ये पडून मृत्यू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - सार्वजनिक शौचालयात शौचास गेलेला १३ वर्षांच्या मुलाचा शौचालयाच्या टाक्यामध्ये पाय घसरून पडल्याने मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्री वाजता उघडकीस आली.

सतीश शहाणे हे जुने शहरातील गुरुदेवनगर येथील टोपले यांच्या घरामध्ये भाड्याने राहतात. त्यांना दोन मुले असून, एकाचे नाव करण तर दुसऱ्याचे नाव अर्जुन आहे. त्यापैकी करण हा १३ वर्षांचा आहे. त्याचे आईवडील मंगळवारी मोलमजुरी करण्यासाठी घराबाहेर गेले होते. दुपारच्या सुमारास करण हा लोकमान्यनगरमध्ये शौचासाठी एकटाच गेला होता. शौचालयाच्या टाकीवर झाकण नसल्यामुळे आणि त्याची दुरवस्था झाल्यामुळे करणचा पाय घसरून तो टाक्यात पडला असावा. त्यानंतर रात्री वाजताच्या सुमारास काही जण शौचास गेले असता, त्यांना टाकीमध्ये मुलगा पडलेला दिसून आला, तर दुसरीकडे करण दिसत नाही म्हणून त्याचा शोध सुरू होता. पोलिस अग्निशमन दलाच्या जवानांनी करणला टाक्यातून बाहेर काढले. त्यानंतर त्याला सर्वोपचारमध्ये हलवण्यात आले होते. करणच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली.