आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 14 Years Old Girl Stolen 5 Lakh Rupee Jeweleries

१४ वर्षांच्या मुलीने भरदिवसा पळवले पाच लाखांचे दागिने

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - तिचं वय झोेपाळ्या वाचून झुलण्याचं.. शाळेत जाऊन मैत्रिणीसोबत बागडण्याचं... पण, दरिद्री काठच्या यातना भोगताना आई-वडिलांमध्ये कलह वाढत गेला. वडील आणि आई दोघांनीही घरोबा मोडून दुसरे विवाह केले. नि अवघ्या १४ व्या वर्षी तिचं बालपणच करपलं. बेसहारा झालेली ती छोट्या-मोठ्या चो-या करायला लागली. आज तर तिच्या हाती तब्बल पाच लाखांच्या दागिन्यांचं घबाड लागलं. पण, गुन्हा तो गुन्हाच. पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं. ही आपबिती आहे कमलकिशोर जाजू यांच्याकडे चोरी करणा-या अल्पवयीन मोरांगीची (बदललेलं नाव).मोरांगी लहान असताना वडिलांनी दुसरं लग्न केलं.
पाठोपाठ आईनेही. कुटुंब विस्कटलं नि बालपण दूषित झालं. ओघानेच खदान परिसरात राहणा-या आजीने तिचा सांभाळ केला. आजीचं पोट तळहातावर. त्यात ती मोरांगीला शाळेत कशी पाठवणार? घरात कुणी बोलणारं नाही, अधून-मधून भेटीला येणा-या आई वडिलांची सतत होत असलेली भांडणं. यात पिचलेली मोरांगी छोट्या-छोट्या वस्तू चोरायला लागली. कुणाचं दार उघड दिसलं की घरात जायचं नि दिसेल ते पळवायचं... आपण चूक करतोय, असं करू नये, असं सांगणारंही तिला कोणी नाही. त्यामुळे ती निर्ढावली. यातूनच तिच्या हातून सोमवारी मोठी चोरी झाली. पोलिसांनी आपले कर्तव्य चोखपणे पार पाडत अवघ्या तीन तासांत तिला ताब्यात घेतलं. आता तिच्यावर गुन्हा नोंदवून तिला बाल सुधारगृहात पाठवतील. पण, मोरांगीने चोरी का केली, याचे पोस्टमार्टेम कुणी करावे?

असे पकडले मोरांगीला : माेरांगीवरच्या मजल्यावर चोरी करून पाय-या उतरत होती. त्यावेळी जाजू यांच्या घरातील एका लहान मुलीने तिने पाहिले आणि कशासाठी आली म्हणून हटकले. त्यावर मोरांगीने मुक्की, बहिरी आणि मानसिक रोगी असल्याचा अभिनय करून तत्काळ पळ काढला. त्यानंतर जाजू परिवारातील इतर सदस्यांनी वर जाऊन पाहिले असता चोरी झाल्याचे निदर्शनास आले. त्यांनी या बाबत पोलिसांनी माहिती दिली. दरम्यान, यापूर्वी तिने सहा महिन्याअगोदर याच प्रकारे जुने शहर आणि रामदासपेठ पोलिस ठाण्याअंतर्गत चोरी केली होती. त्या आधारे पोलिसांनी मोरांगीला ताब्यात घेतले.

अहमदाबादला जाणार होती पळून : मोरांगी आणि तिची आजी खदान परिसरात राहते तर आई आंबेडकरनगरात. पोलिस पहिल्यांदा तिच्या शोधासाठी आंबेडकर नगरात गेले. तिथे तिच्या आईने उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यामुळे संशय अधिक बळावल्याने पोलिसांनी खदान परिसरातील तिच्या आजीच्या घराकडे मोर्चा वळवला. या ठिकाणी ती अहमदाबादला सोने आणि रोख रक्कम घेऊन पळून जाण्याच्या तयारीत होती.

बालपण करपलं, मजबुरी शिरजोर झाली....
अकोल्यातील पोस्ट ऑफिसच्या मागे व्यापारी कमलकिशोर जाजू यांच्या बंगल्यात सोमवार, १५ जूनच्या दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास एका अल्पवयीन मुलीने प्रवेश करून पाच लाख रुपयांच्या दागिन्यांसह पाच हजार रुपये रोख चोरून नेले. या प्रकरणी कोतवाली आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या तीन तासांत एका १४ वर्षीय मुलीला ताब्यात घेतले.