आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

१५ वर्षीय मुलगी बेपत्ता; पालकाने दिली तक्रार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- १५वर्षीय मुलगी घरून बेपत्ता झाल्याची घटना जेतवणनगरमध्ये घडली. ही मुलगी शनिवारी संध्याकाळी घरून निघून गेली. याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी खदान पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून, पोलिसांनी हरवल्याची तक्रार दाखल करून घेतली आहे. १५ वर्षीय मुलगी खदानमधील एका पोंग्याच्या कारखान्यामध्ये काम करते. ती नेहमीप्रमाणे शनिवारी सकाळी घरून कामाला निघून गेली. मात्र, संध्याकाळी उशिरापर्यंत ती परत आलीच नाही. मुलीच्या आईवडिलांनी नातेवाइकांकडे मुलीचा शोध घेतला मात्र मुलगी आढळून आल्यामुळे त्यांनी रविवारी संध्याकाळी पोलिस ठाणे गाठले आणि मुलगी हरवल्याची तक्रार दिली. पोलिस मुलीचा तपास करत आहे.