आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंढरीच्या वारीसाठी निघणार १५० बसेस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - अवघ्या महाराष्ट्राचं दैवत असलेल्या विठुरायांच्या दर्शनासाठी आषाढी एकादशीला भाविकांची मांदियाळी असते. दिंडी, पालखी, पायदळवारी याद्वारे लाखो भाविक पंढरीच्या दिशेने निघाले असून, राज्य परिवहन महामंडळाच्या विभागीय कार्यालयांतर्गतच्या आगारांमधून आषाढीनिमित्त पंढरपूरसाठी १५० बसेसच्या २०४ फेऱ्यांची खास सुविधा उपलब्ध केली आहे.
अकोला विभागीय कार्यालयाकडून दरवर्षी पंढरपूर यात्रेसाठी बसेस सोडण्यात येतात. मागील वर्षी १०८ बसेसच्या १९५ फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले होते. या वर्षी बसेसची संख्याही ४२ ने वाढवून ती १५० एवढी केली आहे. या बसेसच्या गत वर्षीपेक्षा फेऱ्यांमध्येह वाढ झाली आहे. विठुरायांच्या दर्शनासाठी आषाढीला पंढरीत वारकरी, भाविकांचा मेळा जमतो. संत मुक्ताबाईंची पालखी, संत गजानन महाराजांच्या पालखीसोबतच राज्यातून शेकडो पालख्या आषाढीला पंढरपुरात पोहोचतात. संत मुक्ताबाई संत गजाननाची पालखी पंढरीसाठी रवाना झाली आहे. या दिवसांमध्ये महाराष्ट्रातील प्रत्येक रस्ता भाविकांनी हाती घेतलेल्या पताकांनी फुललेले असतात. ज्यांना या पालखीत सहभागी होता येत नाही, असे भाविक खासगी एसटीने पंढरीत दाखल होतात, अशा भाविकांना पंढरीत सहज, सुरक्षित पोहोचून विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन घेता यावे, या उद्देशाने एसटी महामंडळाच्या या १५० विशेष बसेस सोडण्यात येणार आहेत.
आगार बस संख्या फेऱ्या

- अकोला१३ २९
- अकोला२ ३२ ५८
- अकोट ११ २२
- कारंजा १२ २०
- मंगरुळपीर ११ १५
- वाशीम ३४ ५४
- रिसोड २१ ३४
- तेल्हारा १८
- मूर्तिजापूर १४
- एकूण १५० २०४