आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवासातील सुरक्षेसाठी मिळते तत्काळ मदत, १८२ टोल-फ्री क्रमांकावर करा काॅल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - रेल्वे प्रशासनाने यंदाच्या फेब्रुवारीपासून प्रवाशांच्या सोयीसाठी प्रवासात सुरक्षेच्या दृष्टीने काहीही अडचण आल्यास १८२ या टोल फ्री क्रमांकाची सुविधा उपलब्ध करून दिली. मात्र, या योजनेला प्रवाशांचा अल्प प्रतिसाद आहे.

मध्य रेल्वेच्या भुसावळ रेल्वे सुरक्षा बलाकडे या पाच महिन्यांच्या कालावधीमध्ये केवळ २७३ कॉल आले. त्या सर्व प्रवाशांना तत्काळ मदत मिळाली असली, तरी प्रवासी या योजनेचा लाभ पाहिजे तसा घेत नसल्याचे दिसून येते. सद्य:स्थितीमध्ये रेल्वेच्या प्रवासात मोठी गर्दी आहे. प्रवाशांचा रेल्वेकडे कल वाढलेला असून, जलद कमी खर्चात हा प्रवास होतो. मात्र, रेल्वे प्रवासातील असुरक्षितता, महिलांच्या डब्यात बसून छेड काढणे, जनरल तिकिटावर आरक्षित डब्यातून प्रवास, जागेवरून होणारी मारहाण, चोरी, हल्ला झाल्यास प्रवाशांना तत्काळ मदत मिळावी, यासाठी आरपीएफने १८२ हा टोल फ्री क्रमांक सुरू केला आहे.

प्रवाशांनी या क्रमांकावर कॉल करून सुरक्षेबाबत मागणी करताच संबंधित प्रवाशाचे नाव, गाडी, आसन क्रमांक, गाडी कुठे आहे? याची विचारपूस केली जाते. गाडी ज्या विभागातून धावत आहे, तेथील आरपीएफ नियंत्रण कक्षाला माहिती देऊन प्रवाशाला मदत मिळवून दिली जाते. तक्रारीचे निरसन झाल्यावर प्रवाशाकडून लेखी शेरा घेतला जातो. असे असताना या योजनेला प्रवासीवर्गाकडून अल्प प्रतिसाद मिळत आहे. शिवाय, अनेक प्रवासी विनाकारण आणि निरर्थकपणे केवळ दिशाभूल करणे आणि सत्यता पडताळणीसाठीच कॉल करत असल्याचेही रेल्वे अधिकांचे म्हणणे आहे. या सेवेचा रेल्वे प्रवाशांनी लाभ धेण्याची आवश्यकता आहे.

या समस्यांची करा तत्काळ तक्रार
यायोजनेप्रमाणेच रेल्वे प्रशासनाने जनरल तक्रारींसाठी १३८ हा टोल फ्री क्रमांक निर्माण केला आहे. रेल्वेतील अन्य समस्यांबाबत तक्रार करायची असल्यास प्रवासी या क्रमांकाचा वापर करू शकतात. प्रामुख्याने रेल्वेच्या डब्यात पाणी नसणे, अस्वच्छता, खाद्यपदार्थांबाबत तक्रार, अारक्षण नसताना अारक्षित बर्थवर बसून त्रास देणे आदी तक्रारी या क्रमांकावर करता येतात. मात्र, प्रवाशांचा या सुविधांना प्रतिसाद मिळत नाही. या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.