अकोला - ३५वर्षीय महिला तिच्या आईच्या घरी दारात बसली होती. या वेळी २० वर्षीय युवकाने घरी जाऊन तिच्याशी असभ्य व्यवहार केला. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून डाबकी रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जुने शहरातील मुकुंदवाडीमध्ये एक महिला शुक्रवारी तिच्या आईच्या घरी दारात बसली होती. या वेळी शुभम उर्फ राजानंद धांडे याने महिलेशी ‘मी तुझ्यावर प्रेम करतो, माझ्याशी बोलत का नाहीस’ असे म्हटले. यावर महिलेने त्याला मारण्यासाठी हात उगारला असता, त्याने महिलेसोबत अश्लील वर्तन केले आणि तिला मारहाण केली.
याप्रकरणी महिलेने थेट डाबकी रोड पोलिस ठाणे गाठले आणि शुभम उर्फ राजानंद धांडे याच्याविरुद्ध तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि कलम ३५४ (अ), (१), (२), (३), ३२३, ५०४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा तपास एएसआय हरिदास काळे करत आहेत.