आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बच्चे कंपनीला आता 23 दिवस सुट्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - दिवाळीच्या सुट्यांमध्ये प्राथमिक शिक्षण विभागाने बदल केला आहे. 1 ते 16 नोव्हेंबरपर्यंत असलेल्या सुट्या आता 23 नोव्हेंबरपर्यंत वाढवल्याने विद्यार्थ्यांना 23 दिवस सुट्यांचा आनंद घेता येणार आहे.

प्राथमिक शाळांना 16 नोव्हेंबरपर्यंत सुट्या जाहीर केल्या होत्या. मात्र, प्राथमिक शिक्षक संघटनांनी आक्षेप घेतल्याने प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रफुल्ल कचवे यांनी सुट्या 23 नोव्हेंबरपर्यंत वाढवल्या. माध्यमिक शिक्षण विभागाने 12 नोव्हेंबरपर्यंत सुट्या जाहीर केल्या होत्या. माध्यमिक शिक्षक संघटनांनी सुट्या वाढवण्याची मागणी केली होती. माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक सोनवणे यांनीही 16 नोव्हेंबरपर्यंत सुट्या जाहीर केल्या. 17 नोव्हेंबरला रविवार येत असल्यामुळे 18 तर प्राथमिक शाळांचे द्वितीय सत्र 23 नोव्हेंबरपासून सुरूहोणार आहे.