आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावती-मुंबई रेल्वेगाडी जुलैपासून २५ डब्यांची होणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - मुंबईसाठी जाण्यास महत्त्वाची असलेल्या अमरावती-मुंबई रेल्वेगाडीची बोगी वाढवण्याचा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाने मंजूर केला आहे. येत्या जुलैपासून अमरावती रेल्वेगाडीला सहा बोगी नव्याने जोडण्यात येणार असून, गाडीच्या वेळेमध्येही बदल करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

अमरावती-मुंबई रेल्वेगाडी आर्थिकदृष्ट्या प्रशासनास फायदेशीर गाडी असून, या गाडीच्या डब्यांची संख्या कमी असल्यामुळे प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद असल्यामुळे सदर गाडीने प्रवास करणा-या प्रवाशांच्या तिकिटांची वेटिंग संख्या सर्वाधिक आहे. प्रवाशांचे हाल आणि प्रवाशांच्या तक्रारीवर विचार करून रेल्वे मंत्रालयाने १९ डबे असलेल्या गाडीला आणखी सहा डबे जोडण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या सूचनेनुसार दरवर्षी जुलै महिन्यात होणा-या वेळापत्रकांच्या बदलानुसार अमरावती-मुंबई रेल्वेगाडीची वेळ अकोला रेल्वेस्थानकावर रात्री ९.३० वाजता करण्यात आली असून, ही गाडी मुंबई येेथे सकाळी वाजता पोहोचणार आहे. मुंबई येथून निघणा-या अमरावती गाडीचा तूर्तास कोणताही बदल करण्यात आला नसल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून मिळाली आहे. सदर गाडीला वाढीव सहा बोगींपैकी दोन एसी, तीन स्लीपर, एक जनरल अशा बोगी जोडल्या जाणार आहे.
बातम्या आणखी आहेत...