आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

निवडणूक - ३८ इच्छुक रनआऊट, विविध पक्षांमधील दिग्गजांचा समावेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघात एकूण ३८ उमेदवारांचे अर्ज विविध त्रुटींमुळे रद्द झाले. १९९ उमेदवारांमधून ३८ उमेदवार रनआऊट झाल्याने आता एकूण १६० उमेदवार रिंगणात उरले आहेत. यात विविध पक्षांमधील दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. आता किती उमेदवार अर्ज मागे घेतात, त्यानंतरच पाचही विधानसभा मतदारसंघातील राजकीय चित्र स्पष्ट होणार आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी दाखल करण्यात आलेल्या उमेदवारी अर्जांची छाननी २९ सप्टेंबरला करण्यात आली. पाचही विधानसभा मतदारसंघातून एकूण ३८ उमेदवारांचे अर्ज विविध त्रुटींमुळे रद्द करण्यात आले. अर्ज रद्द झालेल्या उमेदवारांमध्ये कोणत्याही राजकीय पक्षाच्या अधिकृत उमेदवाराचा समावेश नाही. मात्र, बंडखोर तसेच अपक्ष उमेदवारांचे अर्ज रद्द झाले. न्यायालयाने दिलेल्या आदेशान्वये उमेदवारी अर्जातील प्रत्येक रकाना भरणे गरजेचे होते. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करताना अनेक उमेदवारांवर दडपण होते. त्या अनुषंगानेच अनेक उमेदवारांनी तीन ते पाच अर्ज दाखल केले. उमेदवारी अर्जात कोणतीही चूक राहू नये, यासाठी अनेकांनी प्रसिद्ध विधिज्ञांकडून अर्ज भरून घेतले. त्यामुळे उमेदवारांना उमेदवारी अर्ज दाखल करताना एक प्रकारे दडपण होते. त्यामुळेच छाननी प्रक्रियेकडे सर्वच उमेदवारांचे लक्ष लागले होते.
अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात एकूण ४५ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. यात शिवसेनेचे निवासी उपजिल्हाप्रमुख राजेश मिश्रा, संजय भोजने, महंमद जमील अहमद, डॉ. रविचंद्र साहू, नानासाहेब हरडे, महंमद सोहेल या सहा जणांचे उमेदवारी अर्ज रद्द झाले. अकोला पूर्वमधून एकूण ३८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. यापैकी भारतीय जनता पक्षाचे विजय अग्रवाल, डॉ. योगेश साहू, शिवसेनेचे सुशांत बोर्डे, आनंद गोठकडे या चार उमेदवारांचे अर्ज रद्द झाले. मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघात एकूण ४२ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. यापैकी विजय घुरडकर, मंगला सोनोने, अशोक कांबळे, भिकाजी अवचार या चार उमेदवारांचे अर्ज विविध कारणांमुळे रद्द झाले.
बाळापूर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक म्हणजे ६९ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. यापैकी रामलाल उमाळे, चंद्रशेखर चिंचोळकर, शिवसेनेच्या ज्योत्स्ना चोरे, सय्यद युसूफ कादीर, डॉ. सुभाषसिंग राजपूत आदी २० उमेदवारांचे अर्ज फेटाळण्यात आले. तर अकोटातून ४९ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते.