आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

४० हजारांच्या नकली नोटा जप्त,

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे भौरद परिसरातून मंगळवारी रात्री ४० हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त करून दोघांना ताब्यात घेतले.
दरम्यान, बुधवार, २४ जूनला दुपारी वाजताच्या सुमारास शिवाजी कॉलेज परिसरातून यातील मुख्य सूत्रधारासही पकडले. तो जुने शहरातील रहिवासी आहे. त्याच्याजवळून नोटा बनवण्यासाठी वापरला जाणारा लॅपटॉप जप्त करण्यात आला.

१०० आणि ५०० रुपयांच्या नकली नोटा चलनात आणण्यासाठी दोघांमध्ये डील होणार असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्याआधारे पोलिसांनी छापा मारून ४० हजार रुपयांच्या नोटांसह मंगळवारी दोघांना ताब्यात घेतले; तर बुधवारी दुपारी यातील मुख्य सूत्रधार असलेल्या एका पंचवीस वर्षीय युवकाला पकडण्यात पोलिसांना यश आले. जुने शहरात त्याचा व्याजाने पैसे वाटण्याचा व्यवसाय असून, या माध्यमातूनच तो नकली नोटा चलनात अाणत असावा, असा संशय आहे. दरम्यान, यामध्ये आरोपींची संख्या अजून वाढण्याची शक्यता आहे. ताब्यात घेतलेल्यांनी कुणा-कुणाला नोटा दिल्या, त्या कुठे चलनात आणल्या, याचा तपास पोलिस करत आहेत. दहा महिन्यांपूर्वी पोलिसांनी पवार नामक व्यक्तीकडूनही नकली नोटा जप्त केल्या होत्या. त्यानंतरची जिल्ह्यात ही दुसरी कारवाई आहे.
पाचमोरीपरिसरात प्रिंटर फोडले
नकलीनोटा छापण्यासाठी वापरण्यात येणारे प्रिंटर अकोट रस्त्यावरील पाचमोरी परिसरात फोडून टाकल्याची माहिती तिसऱ्या आरोपीने पोलिसांना दिली. त्याआधारे पोलिस बुधवारी सायंकाळी प्रिंटर शोधण्यासाठी रवाना झाले होते.
बातम्या आणखी आहेत...