आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संततधार पावसामुळे 42 जनावरे गारठून दगावली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - शिवणी, शिवर व परिसरातील 42 जनावरे संततधार पावसात भिजल्याने लागोपाठ दगावल्याची घटना 24 जुलै रोजी उघडकीस आली. तालुक्यातील 60 पेक्षा जास्त जनावरे पावसात गारठल्याने आजारी पडले होते.
शिवणी, शिवर, कुंभारीसह परिसरात दूध विक्री करणारे काठेवाडी समूहाचे लोक राहतात. त्यांची जनावरे उघड्यावरच बांधून ठेवली जातात. दोन दिवस ही जनावरे पावसात भिजून गारठली. त्यामुळे त्यांना गरजेनुसार चाराही मिळू शकला नाही. परिणामी, अनेक जनावरे आजारी पडली. बुधवारी दुपारच्या दरम्यान यातील काही जनावरे दगावण्यास सुरुवात झाली. गुरुवारी सकाळी परिसरातील अनेक जनावरे मृत पावल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आले. त्यांनी तलाठी यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी परिस्थिती लक्षात घेऊन मंडळ अधिकारी तानाजी सांगळे व सुनील देशमुख यांना घटनेबाबतची हकिगत सांगिंतली. मंडळ अधिकारी यांनी त्वरित आरोग्य विभागाशी संपर्क साधला. आरोग्य विभागाचे डॉ. डी.जी. पाटील हे घटनास्थळी पोहोचून जनावरांची तपासणी केली. शिवणी व कुंभारीच्या मंडळ अधिकार्‍यांनी
घटनेचा पंचनामा केला.
मूर्तिजापुरात चार जनावरे दगावली
मूर्तिजापूर तालुक्यातील भगोरा गावातील चार जनावरे दगावली आहेत. या जनावरांचा
मृत्यूही पावसात गारठल्यामुळे झाला.
संसर्ग नाही
जनावरे ‘हायपोथर्मिया’चे शिकार झाले. त्यामुळे जनावरांचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. शवविच्छेदनाचा अहवाल प्रयोगशाळेत पाठवला आहे. ’’ डॉ. डी. जी. पाटील, अधिकारी
मदतीची आशा
जनावरे अचानक दगावल्याने पशुधन मालकांवर संकट ओढवले आहे. यातून सावरण्यासाठी मदतीची आशा आहे.’’ गभूभाई भरवाड
प्रतिकारशक्ती कमी
रात्रीची थंड हवा अंगात शिरल्याने जनावरे ‘हायपोथर्मिया’चे शिकार झाली. प्रतिकार शक्ती कमी असलेले जनावरे यात आहेत.’’ डॉ. मनोहर तुपकर, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी
लाखोंचे नुकसान
पशुपालकांचे लाखोंचे नुकसान झाले. रोजगाराचे साधन नष्ट झाले. शासनाकडून नुकसानभरपाई मिळेल, अशी आशा आहे.’’ उकाभाई भरवाड
अनेक जनावरे आजाराने बाधित