अकोला - ताजनापेठ परिसरात एका ठिकाणी ४२ बैल कत्तलीसाठी डांबून ठेवल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्या आधारे पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्या नेतृत्वात विशेष पथकाने छापा टाकून या बैलांची सुटका केली. त्यांना शहरातील अकोट फैल भागात असलेल्या महापालिकेच्या कोंडवाड्यामध्ये ठेवण्यात आले. ही कारवाई शनिवार, १८ एप्रिलच्या रात्री ११.३० वाजताच्या सुमारास केली गेली.
राज्य शासनाने गाेवंश हत्या बंदी कायदा लागू केला. या नवीन कायद्याने राज्यात आता बैल आणि वळूची कत्तल करणेही गुन्हा आहे. त्या कायद्याअंतर्गत शहरात केली गेलेली ही पहिली कारवाई असून, रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती.