आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ४२३ कोटींचे कर्जाचे वाटप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा - जिल्ह्यातील विविध बँकाद्वारे पीक कर्जाचे पुनर्गठन नवीन कर्जाच्या वाटपाला गती मिळाली आहे. मागील दहा दिवसांत १०० कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. ३० जूनपर्यंत एकूण कर्जाचे वाटप ४२३ कोटी रुपये आहे. ते एकूण उद्दिष्टाच्या ३४ टक्के आहे.
जिल्ह्यात ७८ हजार ८४८ शेतकरी खातेदार असून, यापैकी १४ हजार २२९ खातेदारांच्या पीक कर्जाचे पुनर्गठन करण्यात आले आहे. तर ६४ हजार ६१९ शेतकऱ्यांनी कर्जाचे नुतनीकरण करून घेतले आहे. मागच्या वर्षीपेक्षा यावेळी कर्ज वाटपात वाढ होणार आहे. मागील वर्षी सप्टेबर महिन्यापर्यँत ४६९ कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले होते. ते एकूण उद्दिष्टाच्या ५१ टक्के होते. या वेळी ६० टक्के कर्ज वाटप होण्याची शक्यता आहे. २०१५-२०१६ या वर्षासाठी राष्ट्रीय कृत बँका, ग्रामीण बँक खासगी बँकामार्फंत पीक कर्ज वाटप पुनर्गठन सुरू आहे.

बँकांचीउद्दिष्टाची टक्केवारी : अलाहाबादबँक - ६२टक्के, बँक ऑफ बडोदा - ३५ टक्के, बँक ऑफ इंडिया - ३० टक्के, बँक ऑफ महाराष्ट्र - ३१ टक्के, सेंट्रल बँक - ३५ टक्के, कॅनरा बँक - टक्के, देना बँक १९ टक्के, आयडीबीआय बँक - १५ टक्के, इंडियन ओव्हरसीज बँक टक्के, ओरिएन्टल बँक - १९ टक्के, पंजाब नॅशनल बँक - १६ टक्के, स्टेट बँक ऑफ हैद्राबाद - २४ टक्के, स्टेट बँक ऑफ इंडिया - ३४ टक्के, सिंडीकेट बँक १४ टक्के, युको बँक टक्के, युनियन बँक आॅफ इंडिया १७ टक्के, अॅक्सीस बँक - टक्के, एचडीएफसी बँक - १४ टक्के, आयसीआय सीआय बँक - टक्के, विदर्भ कोकण ग्रामीण बँक - ४९ टक्के अशाप्रकारे बँकांच्या उद्दिष्टाची टक्केवारी आहे.
दुबार पेरणीच्या सर्वेक्षणाकडे लक्ष
सुरुवातीलाचांगला पाऊस बरसल्यानंतर अचानक पाऊस गायब झाला. पावसाने दडी मारल्यामुळे दुबार पेरणीची वेळ आली. त्यामुळे मदतीचे सर्वेक्षण मदतीची घोषणा अपेक्षित आहे. शेतकऱ्यांचे लक्ष त्याकडे लागले आहे.

शेतकरी पुनर्गठनापासून वंचित राहणार नाही !
जिल्ह्यातीलसर्व बँकांमध्ये कर्ज पुनर्गठनास पात्र असलेला एकही शेतकरी कर्ज पुनर्गठनापासून वंचित राहणार नाही. याबाबत काही अडचण आल्यास विविध बँकांच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहने अग्रणी जिल्हा प्रबंधक शेंडे यांनी केले आहे.

पुनर्गठनानुसार कर्ज वाटप होणारे
^२०१४-२०१५मध्ये काढलेल्या पीक कर्जाचे पुनर्गठन होईल त्याचे पाच वषाचे पाच हप्ते पाडण्यात येतील. या पुनर्गठीत मुदती कर्जाचा पहिला हप्ता जून २०१६ राहणार आहे. एक लाख रुपये कर्जासाठी सर्च रिपोर्ट पंजीकृत गहाणखत करावे लागणार नाही. पुनर्गठन झालेल्या शेतकऱ्याला या वर्षाच्या एकरी पीक कर्ज दरानुसार नवीन पीक कर्ज वाटप करण्यात येईल. पी.एम. शेंडे, जिल्हा प्रबंधक, जिल्हा अग्रणी बँक

१५ जुलैपर्यंत मिळाली मुदतवाढ
पीककर्ज पुनर्गठनासाठी आधी १५ जूनपर्यंत आणि नंतर ३० जूनपर्यंत आणि
आता १५ जुलैपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. पावसाने दांडी मारली. त्यामुळे आता शेतकऱ्यांना पीक कर्जपुनर्गठनाची आवश्यकता भासणार आहे. त्यामुळे कर्ज वाटप कर्ज पुनर्गठनाची कार्यवाही पूर्ण होण्याची शक्यता आहे.