आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फोर-जी प्रकरण : करारात भ्रष्टाचाराचा विरोधकांना संशय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - शहरात भूमिगत पद्धतीने टाकण्यात येणार्‍या फोर-जी कनेक्शन ऑप्टिकल फायबर केबलच्या करारात भ्रष्टाचार झाल्याचा संशय भाजप, अकोला विकास महासंघ व शिवसेनेने व्यक्त केला आहे. हा केवळ संशय असून, या प्रकरणात शहर अभियंता अजय गुजर, जयप्रकाश मनवर, राजेश श्रीवास्तव व उपायुक्त बांधकाम यांनी सर्व नियम धाब्यावर बसवत लाखो रुपयांचा व्यवहार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

महापालिकेत गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत महानगर सुधार समितीचे अध्यक्ष सुनील मेश्राम, विरोधी पक्षनेते हरीश आलिमचंदानी, शिवसेना गटनेत्या मंजुषा शेळके यांनी हे आरोप केले आहेत. हे आरोप करताना ऑप्टिकल फायबर केबलचे जाळे टाकण्यासाठी रिलायन्स कंपनीला महापालिका सार्वजनिक बांधकाम विभागाने 10 जुलै 2013 ला पत्र दिले. कोणत्याही सभागृहाची परवानगी न घेता प्रशासनाने संगनमत करत आठ कोटी 37 लाख 88 हजार 400 रुपये रिलायन्सकडून साधारण पावती देत 7 ऑगस्टला भरून घेतले. महापालिकेत 27 ऑगस्टला झालेल्या महासभेत या विषयी प्रशासनाने समाधानकारक माहिती दिली नाही. भारतीय जनता पक्ष व अकोला विकास महासंघ पुरस्कृत महानगर सुधार समितीने सभागृहात रिलायन्स फोर-जी साठी प्राप्त सर्व रक्कम परत द्या, अशी मागणी केली होती तसेच या प्रकरणातील संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. सभागृहात याविषयी मतदान घेण्याची मागणी केली होती. या मागणीसाठी 40 नगरसेवकांनी पुढाकार घेतल्याचा दावा विरोधकांनी केला आहे. विरोधी पक्षनेते हरीश आलिमचंदानी यांनी भविष्यात या केबलचा व वापरलेल्या जमिनचा कुठलाही फायदा ही कंपनी देणार नसल्याचे सांगितले.

ठेकेदारांची एक कोटी 57 लाखांची बिले 2008, 2009, 2012 व 2013 मध्ये चुकीच्या पद्धतीने मनपा फंडातून केलेल्या कामावर बिल देण्यासाठी वापरला. हा आलेला निधी विविध वर्षांत नवीन रस्ते तयार करण्यासाठी आला.

तो निधी त्याच वर्षांत खर्च करावा, हा नियम तोडून निधी वळता कसा केला, तर एक कोटी 57 लाख रुपयांची बिले कशी देण्यात आली? या प्रकरणातील दोषी अधिकार्‍यांवर कारवाई करा, त्यांना तत्काळ निलंबित करा. या दोन्ही विषयावर कार्यवाही करा, अशी मागणी सुनील मेश्राम, हरीश आलिमचंदानी, मंजुषा शेळके यांनी संयुक्तपणे केली आहे.