आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 5 Lakh Shopping In ATM Card, Offense On Criminal

एटीएम कार्डमधून केली परस्पर पाच लाखांची खरेदी, गुन्हा दाखल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - एटीएमकार्डचा क्रमांक विचारून आरोपीने परस्पर चार लाख ९४ हजार रुपयांची खरेदी केली. याप्रकरणी खदान पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खदान परिसरातील नित्यानंदनगर येथील विवेक पाटील यांच्या एटीएममधून परस्पर लाख ९४ हजार रुपयांची खरेदी करण्यात आली. त्यांना बँकेतून बोलतो म्हणून जून २०१५ रोजी एक फोन आला. फोनवरून त्यांनी तुमचे एटीएम कार्ड जुने झाले असल्यामुळे बदलवायचे आहे. त्यासाठी एटीएम कार्डचा नंबर विचारण्यात आला. विवेक पाटील यांनी एटीएम कार्डचा क्रमांक सांगितला. त्यानंतर काही तासांच्या आतच त्यांच्या मोबाइलवर खरेदी झाल्याचा एसएमएस आला. तेव्हा त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी याप्रकरणी खदान पोलिसात तक्रार दिली होती.