आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एलबीटीतून मिळाले ५० कोटी, स्थानिक संस्था कराच्या माध्यमातून मनपाच्या कराची विक्रमी वसुली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - महापालिका प्रशासनाने २०१४-२०१५ या आर्थिक वर्षात आपल्या उत्पन्नात वाढ केली आहे. मालमत्ता करातून २८ कोटी ८५ लाख रुपयांचा विक्रमी मालमत्ता कर वसूल केला असून, स्थानिक संस्था कराच्या माध्यमातून ५० कोटी ४१ लाख रुपये वसूल केलेत. महापालिका अस्तित्वात आल्यापासून मोठ्या प्रमाणात उत्पन्न वाढण्याची ही पहिलीच घटना आहे.

महापालिकेचे मालमत्ता कर, स्थानिक संस्था कर, परवाना शुल्क, बाजार वसुली, विकास शुल्क हे उत्पन्नाचे महत्त्वाचे स्रोत आहेत. यापैकी मालमत्ता कर वसुलीकडे आतापर्यंत प्रशासनाने दुर्लक्ष केले होते. महापालिका क्षेत्रातील हजारो मालमत्तांची नोंद केल्याने तसेच रिअसेसमेंट केल्याने महापालिकेला कोट्यवधी रुपयांच्या महसुलापासून वंचित राहावे लागत आहे. या प्रकाराकडे कोणत्याही अधिकाऱ्यांनी गंभीरतेने पाहिले नाही. मात्र, उपायुक्त माधुरी मडावी यांनी मालमत्ता कर वसुलीकडे विशेष लक्ष दिले. एवढेच नव्हे तर नव्याने कर निर्धारणाची मोहीमही त्यांनी सुरू केली.

महापालिकेचे सर्व कर वसुली विभागांतर्गत विभागप्रमुख आणि सर्व कर वसुली लिपिक पथकांनी सुटीच्या दिवसांही कर वसुलीसाठी आपले कर्तव्य पार पडले. यासाठी मोहिमेसाठी पूर्व झोनचे क्षेत्रीय अधिकारी कैलास पुंडे, कर अधीक्षक नंदकिशोर उजवणे, गजानन घोंगे, राजेंद्र गाडगे, विठ्ठल देवकते, विजय खवले, माणिक सटवाले, स्थानिक संस्था कर अधिकारी दिलीप जाधव, सुनील मालटे, संतोष नायडू, उमेश सटवाले, संतोष सूर्यवंशी, देवेंद्र भोजने, गणेश टाले, विष्णू राठोड, मंगेश जाधव, राजू मिसुरकर, शंकर वर्मा यांच्या पथकाने पुढाकार घेतला.