आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरकुलासाठी मागितली ५० हजारांची खंडणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - घरकुलाच्यामोबदल्यात ५० हजार रुपये खंडणी मागितल्या बाबतची तक्रार सामाजिक कार्यकर्ते कमलपुत्र सिरसाट यांनी सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात १८ सप्टेंबर रोजी दिली आहे.

सिध्‍दार्थ वाहुरवाघ यांच्या आजी मेथाबाई काशिराम सिरसाट यांचे नाव दारदि.्र्यरेषेच्या यादीत चुकले होते. त्यांनी तेव्हाच यादी प्रसिध्‍द झाल्यानंतर गटविकास अधिकारी यांच्याकडे अर्ज केला होता. तशी दुरुस्तीही यादीत करण्यात आली होती. परंतु, आजीचा सन २०११ मध्ये मृत्यू झाला. त्यानंतर शासनाच्या रमाबाई आवास योजनेंतर्गत घरकुल मिळण्यासाठी कुटुंबप्रमुख म्हणून त्यांचे वडील निरंजन सिरसाट यांना लाभ मिळाला. परंतु, शिवणी येथील सिध्‍दार्थ अशोक वाहुरवाघ यांनी जाणीवपूर्वक लाभ कसा मिळाला, असे म्हणून वाद घालणे सुरू केले.
हा लाभ त्यांच्या आई चंद्रकला अशोक वाहुरवाघ यांच्या नावे द्यावा, असा दबाव आणून प्रशासनावर वेगवेगळ्या तक्रारी करणे सुरू केले. मात्र, काहीही झाले नाही म्हणून शेवटी सिध्‍दार्थ वाहुरवाघ यांनी १८ सप्टेंबर रोजी सकाळी अंदाजे १०.३० वाजताच्या दरम्यान शिवणी रस्त्यावर मला भेटून ५० हजार रुपयांची मागणी केली. जर पैसे नाही दि.ले, तर तक्रार करण्याची धमकी दिली, अशाप्रकारची तक्रार कमलपुत्र सिरसाट यांनी सिव्हिल लाइन्स पोलिसात केली आहे.