आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

500 खाटांचे होणार जिल्हा स्त्री रुग्णालय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - सध्या जिल्हा स्त्री रुग्णालय 300 खाटांचे असून, यामुळे रुग्णांची हेळसांड होत आहे. पाच महिन्यांपूर्वी बेड वाढवण्याबाबत प्रस्तावसुद्धा सादर करण्यात आला आहे. आरोग्य सहसंचालक डॉ. अर्चना पाटील यांनी लवकरच हा प्रo्न मार्गी लावण्याची ग्वाही दिली.

तसेच माता मृत्यू व बाल मृत्यू टाळण्यासाठी गरोदर मातांना सर्वतोपरी सुविधा पुरवण्याचे आदेश आरोग्य सहसंचालक डॉ. अर्चना पाटील यांनी दिले. गुरुवारी सायंकाळी 7 वाजता त्यांनी जिल्हा स्त्री रुग्णालयाला भेट दिली. या वेळी त्यांनी उपस्थित वैद्यकीय अधिकार्‍यांना मार्गदर्शन केले. या बैठकीला अतिरिक्त संचालक (मलेरिया) डॉ. पी. एल. माने, आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. शशिकांत जाधव, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आर. एच. गिरी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आशीष भारती, आरोग्य परिमंडळाच्या मुख्य प्रशासकीय अधिकारी करुणा सुरवाडे, साहाय्यक संचालक (मलेरिया) डॉ. दुर्योधन चव्हाण, जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षीका डॉ. आरती कुलवाल, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. संगीता काळे, वैद्यकीय अधीक्षीका डॉ. आरती कुलवाल आदी उपस्थित होते. .

प्रसूती कक्षाला भेट
जिल्हा स्त्री रुग्णालयाची या वेळी सहसंचालक डॉ. पाटील यांनी पाहणी केली. प्रामुख्याने प्रसूती कक्षात भेट देऊन तेथील गर्भवती महिलांशी संवाद साधला.आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकारी येणार म्हणून रुग्णालय चकाचक करण्यात आले होते.

मॉडेल ग्रामीण रुग्णालय
जिल्हय़ातील ग्रामीण रुग्णालय, बार्शिटाकळी येथे आरोग्य सहसंचालक डॉ. अर्चना पाटील यांनी व्हिजिट दिली. या वेळी उत्कृष्ट प्रशासनाबाबत व रुग्णसेवा पुरवत असल्याबाबत त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आर. एच. गिरी यांची प्रशंसा केली.