आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 56 Post Still Vacant In Akola State Transport Department

एसटी वर्कशॉपमध्ये ५६ पदे रिक्त; १५६ कामगारांवर ताण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - राज्य परिवहन महामंडळाच्या विभागीय वर्कशॉपमध्ये एसटी बसेसच्या दुरुस्तीचे महत्त्वपूर्ण कामकाज होत असते. याठिकाणी २१२ कामगारांपैकी ५६ पदे रिक्त असल्याने १५६ कामगारांवर कामाचा अधिक ताण पडत आहे.
विभागीय वर्कशॉपमध्ये अकोला वाशीम जिल्ह्यातील एकूण आगारांतील नादुरुस्त अपघातग्रस्त बसेसच्या दुरुस्तीचे काम करण्यात येते. यासाठी मशीन शॉप, इंजीन विभाग, सज्जक विभाग, इलेक्ट्रिक विभाग, अल्टरनेटर विभाग, वेल्डिंग, रंगकाम, प्लान्ट न्सी विभाग, रिक्रायबल, लोहार विभाग, पेट्रोल विभाग या ११ विभागांची स्थापना करण्यात आलेली आहे. तसेच आरटीओ पासिंग रिक्रंजसनिंग, असे दोन विभागही आहेत. त्यामध्ये यंत्र अधिकारी, सहायक यंत्र अधिकारी यांच्याशिवाय इतर कर्मचारी आणि १५६ कामगार कार्यरत आहेत.
एसटी बसेसच्या अपघातांचे प्रमाण वाढले असून, अनेक बसेस मोडकळीस आलेल्या आहेत. त्या कशाबशा रोडवर धावतात, आणि वारंवार नादुरुस्त होतात. या बसेसची दुरुस्ती करून त्यांना पूर्ववत रोडवर धावण्यासाठी तयार करण्याचे महत्त्वपूर्ण काम कामगार करतात. मात्र, येथील ५६ कामगारांची पदे रिक्त आहेत. महामंडळाला आधीच बसेसची कमतरता भासत असते. त्यामुळे अनेक बसफेऱ्या रद्दही कराव्या लागतात.
चालक-वाहकांचीही पदे रिक्त असल्यामुळे बसफेऱ्या वाढवण्याचा पर्यायही एसटी प्रशासनासमोर नसतो. अशा परिस्थितीत कामगारांची कमतरता असतानाही नादुरुस्त बसेस त्वरित दुरुस्त करण्याचे मोठे कसब कार्यरत कामगारांना दाखवावे लागते. वारंवार मागणी केल्यानंतर महामंडळाकडून कामगारांचा प्रश्न मार्गी लागत नाही. त्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे.