आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षकांची 588 पदे अनुदानासाठी पात्र!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- राज्यातील विनाअनुदानित शाळांतील 507 तुकड्यांना शिक्षण विभागाने मंजुरी दिली. त्यामुळे शिक्षकांची 588 पदे अनुदानास पात्र होणार आहेत. ही पदे भरण्यासाठी नियमाचे पालन करावे लागणार आहे.

शालेय शिक्षण विभागाकडून मूल्यांकन करण्यात आले. या मूल्यांकनाच्या निकषांची पूर्तता करणार्‍या आणि विनाअनुदानित प्राथमिक शाळांतील 507 तुकड्या अनुदानास पात्र ठरवल्या आहेत. यासाठी शालेय शिक्षण विभागाने निर्णय घेतला असून, यात मराठी माध्यमाच्या आणि उर्दू शाळांचा समावेश आहे. अनुदानास पात्र ठरवलेल्या शाळांना पहिल्या टप्प्यात जून 2012 पासून 20 टक्के अनुदान मिळणार आहे. शालेय शिक्षण विभागाने 15 नोव्हेंबर 2011 च्या निर्णयाप्रमाणे राज्यात असलेल्या विनाअनुदानित शाळांना अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी शाळांमधील उपलब्ध सोयी-सुविधांसाठी निकष निश्चित केले होत़े त्यामुळे राज्यातील कायम विनाअनुदानित शाळांमधील कायम हा शब्द वगळून या शाळांना अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता़

या पार्श्वभूमीवर राज्यातील विनाअनुदानित शाळांकडून मूल्यांकनाचे निकष पूर्ण करणार्‍या शाळांना अनुदानास पात्र ठरवले आह़े मात्र, ज्या शाळा अनुदानास पात्र ठरल्या आहेत, त्यांना शालेय शिक्षण विभागाने ठरवून दिलेल्या नियमावलीचे काटेकोर पालन करणे अनिवार्य आह़े यासाठी शिक्षण हक्क कायद्यानुसार किमान पटसंख्या, विहित प्रमाणानुसार मागासवर्गीय व इतर प्रवर्गाच्या आरक्षित पदांची भरती आदी आवश्यक असणार आह़े

अनुदानास पात्र ठरलेल्या शाळांमध्ये खासगी प्राथमिक विनाअनुदानित तत्त्वावर मान्यता दिलेल्या 156 प्राथमिक शाळेच्या वर्गाचा कायम विनाअनुदानित तत्त्वावर मान्यता दिलेल्या खासगी प्राथमिक शाळेतील 351 शाळांचा समावेश आहे तसेच या शाळांमध्ये अध्यापनाचे काम करणार्‍या शिक्षकांच्या 588 पदांनाही अनुदानास पात्र ठरवले आहे. कायम विनाअनुदानित आणि विनाअनुदानित तत्त्वावर मान्यता असलेल्या 11 शाळा अपात्र ठरवल्याची माहिती आहे. यासंदर्भात अकोला जिल्ह्यातील शिक्षण विभागाशी संपर्क साधला असता, तसे पत्र प्राप्त झाले नसल्याची माहिती उपशिक्षणाधिकारी विजय वनवे यांनी दिली.