आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 6 Terrorist Absconding On Khandwa Jail High Alert In State

खंडवा कारागृहातून 6 दहशतवादी झाले फरार, राज्यभर हाय अलर्ट जारी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - दहशतवादी संघटना राज्यात सक्रिय झाल्याची शक्यता गुप्तचर संस्थांनी वर्तवली आहे. २६ जानेवारीच्या पृष्ठभूमीवर राज्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. एटीएसला वॉन्टेड असलेले सहा दहशतवादी हल्ला घडवून आणू शकतात. हे सर्व दहशतवादी खंडवा येथील असून, खंडवा कारागृहामधून ते फरार झाले आहेत. या दहशतवाद्यांना अकोला हे केंद्रस्थानी असल्यामुळे त्यांच्या हालचालींवर अकोला एटीएस नजर ठेवून आहे.

अनेक दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असलेले वॉन्टेड दहशतवाद्यांपऔकी सहा जण हे खंडव्याचे आहेत. त्यामध्ये शेख मेहबूब उर्फ गुड्डू वल्द इस्माईल खान वय २६, अमजद खान उर्फ दाऊद पप्पू वल्द रमझान खान वय २६, असलम खान उर्फ संतोष उर्फ बिलाल वल्द अय्युब खान वय २८, मो. एजाजुद्दीन उर्फ रियाज उर्फ राहुल वल्द मो. अजीजुद्दीन वय ३१ वर्षे, जाकीर हुसेन उर्फ सादिक खान उर्फ विक्की डॉन उर्फ वनियो कुमार वय ३२ आणि मोहम्मद सलीक उर्फ सल्लू उर्फ युनूसभाई वल्द अब्दुल हकीम वय ३२ यांचा समावेश आहे. हे सर्व दहशतवादी खंडवा जेलमध्ये बंदिस्त होते. मात्र, तेथून ते ऑक्टोबर २०१३ मध्ये पळून गेले आहेत. येथील हे सर्व दहशतवादी एटीएससाठी वॉन्टेड आहेत. या दहशतवाद्यांनी पुणे, दिल्लीमध्ये बॉम्बस्फोट घडवला आहे. अबू फऔजम हा त्यांचा म्होरक्या आहे. त्याला एटीएसने पकडले होते.

छुप्या पद्धतीने करताहेत वास्तव्य
दहशतवादीहे सार्वजनिक ठिकाणी वावरत आहेत तसेच ते छुप्या पद्धतीने वास्तव्य करत असून, नागरिकांना त्यांच्यासंबंधी माहिती असल्यास एटीएसच्या अकोला युनिटला ०७२४-२४४५३४३ या क्रमांकावर कळवावी, माहिती देणाऱ्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येणार असल्याची माहिती एटीएसने दिली आहे.

बॉम्बस्फोट घडवण्याच्या शक्यतेने शोधमोहीम
हेसर्व सहाही दहशतवादी फरार असून, ते बॉम्बस्फोटासारखे दहशतवादी कारवाया करण्याची शक्यता पाहता या दहशतवाद्यांचा शोध एटीएस घेत आहे. या पृष्ठभूमीवर राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि एटीएस पथक दहशतवाद्यांच्या शोधासाठी वेगवेगळ्या प्रकारे शोधमोहीम राबवत आहेत.
पुढील स्‍लाइडवर वाचा, दहशतवाद्यांचे अकोला आणि औरंगाबादशी असलेला संबंध..