आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 65 Villages Get Polluted Water In Akola District

जिल्ह्यातील 65 गावांमध्ये होतोय दूषित पाणीपुरवठा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - जिल्हय़ातील मोर्णा नदीवर दोन ठिकाणी व काटेपूर्णा, पूर्णा नदीवर प्रत्येकी एका ठिकाणी राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे लक्ष आहे. पण, डिसेंबरमध्ये तपासलेल्या पाण्याच्या नमुन्यात दूषित पाण्याची नमुना सापडला नाही, अशी माहिती मिळाली आहे. पाण्यातील क्षार,ऑक्सिजनची मात्रा यावरून पाण्याची गुणवत्ता ठरते. यात कमतरता नाही. पण, मोर्णेचे पाणी अकोल्याच्या पुढे हे गटार असल्याची बाब सर्वांना ज्ञात आहे, अशी माहिती आहे.


काटेपूर्णा येथे राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळातर्फे पाण्याची तपासणी करण्यात येते. या ठिकाणाहून शहराला पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे येथील पाण्याची तपासणी केली जाते. नागपूरच्या प्रयोग शाळेत या पाण्याची तपासणी केली जाते, तर मोर्णेवर गणेश घाट व रेल्वे उड्डाणपुलाजवळ तपासणीसाठी दोन केंद्र आहे. या दोन्ही ठिकाणी शहरातून जाणार्‍या मोर्णा नदीत गटार असल्याचे समोर आले आहे. पूर्णा नदीवर अंदुराजवळ मोर्णा नदी मिळाल्यानंतर पाण्याची तपासणी केली जाते. या पाण्यात औद्योगिक घटक मिसळले काय, याचा तपास करण्यात येतो. गेल्या अहवालात येथील पाण्याची गुणवत्ता ढासळली नव्हती. पूर्णेच्या पाण्यामुळे लोकांना होणारे आजार पाहता, या भागातील पाण्याची तपासणी केली जाईल, अशी माहिती मिळाली आहे.


दूषित पाणी पिण्यासाठी किंवा अंघोळीसाठी वापरल्यास जलजन्य व त्वचाविकार उद्भवतात. यामध्ये प्रामुख्याने गॅस्ट्रो, काविळ, आतड्याचे आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी स्वच्छ पाणी वापरावे तसेच पाण्यात ब्लिचिंग पावडरचा वापर करावा, उकळलेले पाणी प्यावे. डॉ. आर. एच. गिरी, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला.

पाण्यात ब्लिचिंग पावडर वापरा
पूर्णेत मिसळते दूषित पाणी : मूर्तिजापूर तालुक्यातील कोळसरा येथे अमरावती औद्योगिक वसाहतीमधून येणारे पाणी मिसळते. हे पाणी दूषित असल्याचे सूत्रांनी सांगिंतले. हे पाणी पूर्णेपासून दूर ठेवण्यासाठी शासनातर्फे प्रस्ताव गेला आहे. मात्र, यावर अंमलबजावणीाची प्रक्रिया थांबली आहे. हे दूषित पाणी अडवल्यास पूणेचे पाणी चांगले राहू शकते.
अमरावती औद्योगिक वसाहतीतून अंबा नाला, पेढी नदीमार्गे पूर्णेला मिळणारा पाणीपुरवठा हा दूषित झाला आहे. या दूषित पाण्याचा फटका पूर्णेच्या काठावरील 65 गावांना बसला आहे. यावर राजकीय रणकंदन होण्याची चिन्हे आहे. या पाण्याने या भागातील नागरिकांना त्रास होत असून, जनावरांसाठी ते पाणी पिण्यायोग्य नाही. या भागातील नागरिकांनी प्रशासनाकडे तक्रारी केल्या, मात्र त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे त्याची अधिकार्‍यांनी दखल घ्यावी. दरम्यान, दूषित पाण्याने जिल्हा परिषदेमार्फत 40 गावे बाधित झाल्याचे वृत्त आहे. या भागातील नागरिकांनी 65 गावांना त्याचा फटका बसल्याचे सांगितले.

पूर्णेतून होतो 40 गावांना पाणीपुरवठा : पूर्णा नदीतून अकोट, मूर्तिजापूर तालुक्यातील 40 गावांना पाणीपुरवठा होतो. यात गोपाळखेड, कट्यार, केळीवेळी, दोनवाडा, कोळसरा पाणीपुरवठा योजनांचा समावेश आहे, अशी माहिती ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे शाखा अभियंता एस. ए. तिडके यांनी दिली.