आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मालमत्ता मोजणीसाठी ७१ टीम झाल्या कार्यरत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- महापालिकेचे उत्पन्न वाढवण्याच्या हेतूने प्रशासनाने महापालिका क्षेत्रातील सर्व मालमत्तांवर नव्याने करनिर्धारण निश्चित करण्याच्या मोहिमेला गती दिली आहे. महापालिकेतील सर्वच कर्मचाऱ्यांना या कामात सामावून घेतले गेले असून, एकूण ७१ टीम २८ एप्रिलपासून कार्यरत करण्यात आल्या. या मोहिमेमुळे महापालिकेला मालमत्ता करातून कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळणार आहे.

महापालिका अस्तित्वात आल्यापासून रि-असेसमेंट केलेले नाही. त्यामुळे आधीची मालमत्ता आत्ताच्या मालमत्तेत वाढ झाली आहे. कवेलूची जागा स्लॅबने घेतली आहे, तर एका रूमच्या चार रूम झाल्या आहेत. परंतु, या झालेल्या बदलाची नोंद केल्यामुळे कर आकारणी मात्र जुनीच सुरू आहे. या प्रकारामुळे महापालिकेला कोट्यवधी रुपयांच्या महसुलापासून वंचित राहावे लागत आहे.

तसेच महापालिका क्षेत्रातील हजारो मालमत्तांची नोंदणी झाल्याने या मालमत्तांवर कर आकारणीच झालेली नाही. यापूर्वी आलेल्या अधिकाऱ्यांनी रि-असेसमेंट करण्याचे आश्वासन दिले. परंतु, या आश्वासनाची पूर्तता केली नाही. परंतु, उपायुक्त माधुरी मडावी यांनी मात्र या कामात पुढाकार घेतला. आयुक्त सोमनाथ शेट्ये यांच्या मार्गदर्शनाखाली दक्षिण झोनपासून ही मोहीम सुरू करण्यात आली. फेब्रुवारी महिन्यात सुरू करण्यात आलेल्या या मोहिमेत आतापर्यंत १५०० पेक्षा जास्त मालमत्तांचे मोजमाप पूर्ण झाले असून, त्यावर नव्याने कर आकारणीचे काम सुरू आहे. परंतु, या पथकात कर्मचाऱ्यांची संख्या मोजकी होती.
तसेच एका पथकाच्या माध्यमातून ही मोहीम संपूर्ण महापालिका क्षेत्रात राबवण्यास विलंब लागेल, ही बाब लक्षात घेऊन चार महिन्यात महापालिका क्षेत्रातील सर्व मालमत्तांच्या मोजणीचे काम पूर्ण करण्याच्या हेतूने ७१ पथक तयार करण्यात आले आहे. एका पथकात चार कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. सकाळी ते १२ तसेच दुपारी ते सायंकाळी या वेळेत आपले दैनंदिन कामकाज सांभाळून ही पथके मालमत्तांचे मोजमाप करणार आहेत. २८ एप्रिलपासून या पथकांनी आपले काम सुरू केले असून, यापैकी काही पथके मालमत्तांना क्रमांक देण्याचे काम करताहेत.

चार महिन्यात संपूर्ण शहरात ही मोहीम राबवण्याचा प्रशासनाचा हेतू असून, सर्व मालमत्तांचे मोजमाप झाल्यानंतर लगेच करनिर्धारणाचे काम सुरू होऊन सहा महिन्यांच्या आत कर आकारणीची पावती संबंधित मालमत्तांना दिली जाईल. यामुळे महापालिकेला २०१५-२०१६ या आर्थिक वर्षात कोट्यवधी रुपयांचा मालमत्ता कर प्राप्त होऊ शकतो. महापालिकेचे उत्पन्न वाढवण्याच्या हेतूने प्रशासनाने महापालिका क्षेत्रातील सर्व मालमत्तांवर नव्याने करनिर्धारण निश्चित करण्याच्या मोहिमेला गती दिली आहे. महापालिकेतील सर्वच कर्मचाऱ्यांना या कामात सामावून घेतले गेले आहे.

अभियंत्यांची कमतरता
मालमत्तांचेमोजमाप करण्यासाठी ७१ पथके गठित केली. परंतु, अभियंत्यांची संख्या मात्र २६ आहे. या अभियंत्यांना आपले दैनंदिन कामकाज सांभाळूनच मालमत्तांचे मोजमाप करण्याचे काम करावे लागणार असल्याने अभियंत्यांवर कामाचा ताण वाढला आहे.

शिवाजी इंजिनिअरिंग कॉलेजची मदत घेऊ
आयटीआयसंस्थेने विद्यार्थी पुरवण्यास नकार दिला असला तरी शिवाजी इंजिनिअरिंग कॉलेजमधील शिकाऊ अभियंते मिळण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहेत. शिवाजी इंजिनिअरिंगमधून विद्यार्थी उपलब्ध झाल्यास या मोहिमेला गती येईल. माधुरीमडावी, उपायुक्त

वेळेमुळे आयटीआय संस्थेने दिला नकार
आयटीआयसंस्थेने सिव्हिल ड्राप्समनचा कोर्स करणारे विद्यार्थी मालमत्तांचे मोजमाप करण्यासाठी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, यासाठी आयटीआय संस्थेच्या विद्यार्थ्यांचा खर्ची होणारा वेळ लक्षात घेऊन आयटीआय प्रशासनाने विद्यार्थी पुरवण्यास नकार दिला.