आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन वर्षामध्ये केवळ 787 ‘शुभमंगल’ची झाली नोंद

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- सह दुय्यम निबंधक कार्यालयात तीन वर्षात अकोला, वाशिम जिल्ह्यांमधून 787 विवाहांची नोंद करण्यात आली. सर्वाधिक विवाह 2013 मध्ये, सर्वात कमी विवाह 2011 मध्ये झाल्याची नोंद आहे. यावरून विवाहाच्या नोंदणीबाबत फारशी जागरूकता नसल्याचे दिसून येते.
काही वर्षांपासून शासनाद्वारे सामूहिक विवाह सोहळ्यासाठी विविध योजना राबवण्यात येत आहेत. त्यामुळे बहुतांश नागरिकांचा कल सामूहिक विवाहांकडे आहे. विवाह सोहळ्यांवरील खर्च दिवसेंदिवस वाढताच असला, तरी काही जणांकडून त्यालाच पसंती दिली जाते. विविध पद्धतीने विवाह पार पडत असताना विवाहबद्ध झालेल्यांची नोंद करण्याबाबत मात्र फारशी जागरूकता नसल्याची वस्तुस्थिती आहे.
प्रशासकीय प्रकरणांमध्ये अडचणी उद्भवू नयेत, तसेच एखाद्या प्रकरणात संभाव्य कायदेशीर बाबींमध्ये पुरावा उपलब्ध व्हावा आदी हेतूने विवाह नोंदणी करणे आवश्यक असते. मात्र, दुय्यम निबंधक कार्यालयात विवाह नोंदणी करणार्‍यांची संख्या कमी असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. अकोला आणि वाशिम जिल्ह्यातून मागील दोन वष्रे आणि या वर्षी अद्यापपर्यंत केवळ 787 विवाहांची नोंद करण्यात आली आहे.
प्रयत्न होणे आवश्यक : सह दुय्यम निबंधक कार्यालयात नागरिकांनी विवाहाची नोंदणी करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यासाठी समाजात जागृती करणे आवश्यक झाले आहे. जर येणार्‍या काळात जागृती झाली तर त्याचा फायदा भविष्यात होईल.
विवाहाच्या नोंदणीची संख्या
महिना 2011 2012
जानेवारी 13 21
फेब्रुवारी 26 32
मार्च 28 27
एप्रिल 19 27
मे 36 23
जून 17 35
जुलै 22 24
ऑगस्ट 13 14
सप्टेंबर 13 13
ऑक्टोबर 08 09
नोव्हेंबर 17 16
डिसेंबर 11 18
एकूण 223 259
नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे
> वराचे वय 21 वर्षे पूर्ण व वधूचे वय 18 वष्रे पूर्ण असल्याचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, जन्माचा दाखला यांच्या मूळ प्रतींसह सत्यप्रत. वर व वधूची पासपोर्ट आकाराची दोन छायाचित्रे
> वर व वधूचा रहिवासी असल्याबाबतचा पुरावा, शिधापत्रिका, निवडणूक ओळखपत्र, वीज बिल, दूरध्वनी बिल, पासपोर्ट, व्हिसा यांच्या मूळ प्रतींसह सत्यप्रत.
> तीन साक्षीदारांचे रहिवासी पुरावे, शिधापत्रिका, निवडणूक ओळखपत्र, वीज बिल, दूरध्वनी बिल, पासपोर्ट, व्हिसा यांच्या मूळ प्रतींसह सत्यप्रत.
> वर किंवा वधू विधवा घटस्फोटित असल्यास फारकत पत्राची सत्यप्रत, न्यायालयाच्या हुकूमनाम्याची सत्यप्रत.