आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात धावताहेत ८३ टक्के विनापरवाना ऑटोरिक्षा, सिटी बस नसल्याने नागरिकांची गैरसोय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - शहरामध्ये ऑटोंची संख्या भरमार झाल्यामुळे वाहतुकीचा प्रश्न जटिल बनत आहे. शहरातील एकूण धावणाऱ्या ऑटोंपैकी केवळ १५ टक्केच ऑटो हे अधिकृत असून, ८३ टक्के ऑटो हे अनधिकृत असल्याचे आढळून आले आहे. शहरांमध्ये अधिकृतच ऑटो धावतील, अशी भूमिका पाेलिस प्रशासनाने घेतल्याने ऑटोचालकांची गोची झाली आहे.

लोकसंख्येच्या तुलनेत शहरातील नागरिकांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ये-जा करण्यासाठी सिटी बसची व्यवस्था नाही. त्यामुळे ऑटोने जाण्याशिवाय विद्यार्थी आणि नागरिकांसमोर गत्यंतर नाही. त्यामुळे शहरात अधिकाधिक ऑटोंची आवश्यकता भासत गेली आणि ग्रामीण भागासाठी परवाने घेतलेले ऑटो हे शहराकडे वळू लागले. मात्र, आजपर्यंत पोलिस प्रशासनाने नियम उपस्थित केल्यामुळे गुपचूप सर्व व्यवहार सुरू राहिले. मात्र, शहरातील वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनत गेल्यामुळे वाहतुकीला वळण लावण्याचा प्रयत्न पोलिस प्रशासनाने करण्याचा प्रयत्न केला आहे.
त्यामुळेखरी वस्तुस्थिती समोर आली. उपप्रादेशिक परिवहन विभागाने शहरात ३,०८९ ऑटोंना परमिट दिले आहे. त्यापेक्षा जास्त ऑटो शहरालगत असलेल्या ग्रामीण भागातील शहरात धावत आहेत. अशा ऑटोंची संख्या आठ हजारांवर गेली आहे.
ऑटोंना नंबर दिल्यामुळे उघडे पडले पितळ
पोलिस प्रशासनाने शहरातील अधिकृत ऑटोंना नंबर दिल्यामुळे वैध आणि अवैध ऑटोंचे पितळ उघडे पडले. पोलिस प्रशासनाने चार हजार ऑटोंसाठी नंबर तयार केले होते. त्यापैकी केवळ १,३७० ऑटोंचे चालकच ऑटो घेऊन गेले. उर्वरित ऑटो अवैध असल्यामुळे त्यांनी नंबर नेल्यामुळे ते अवैध असल्याचे दिसून आले.