आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 95 Thousand Farmers Will Be Free From Lender Loan

९५ हजार शेतकरी होणार सावकारी कर्जातून मुक्त, सरकार व्याजाची परतफेड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- शेतकरी आत्महत्या विदर्भात मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. यावर उपाययोजना म्हणून वैध सावकारी कर्जमाफीची घोषणा राज्य शासनाने नागपूर अधिवेशनात केली होती. याबाबतचा अध्यादेश निघाला असून, अकोला जिल्ह्यातील ९५ हजार ३१२ शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे.

निसर्गाची अवकृपा गत काही वर्षांपासून शेतकऱ्यांचा पिच्छा सोडायला तयार नाही. कधी पावसाची दडी, कधी अतिवृष्टी, गारपीट अन् वादळी वाऱ्यासह वेळी-अवेळी बरसणाऱ्या जलधारांमुळे शेतकऱ्यांच्या हातचे उत्पन्न गेले. होत्याचे नव्हते झाल्याने कुटुंबाचा गाढा कसा हाकावा, हीच मूळ समस्या या जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाला सतावत आहे. यातून नैराश्य आल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला. त्यामुळे हे आत्महत्याग्रस्त कुटुंबीय उघड्यावर पडले आहेत. आजही शेतकरी आत्महत्येचे सत्र थांबायचे नाव घेत नाही. शेतकरी वर्गाच्या समस्या, अडचणी त्याच असून, त्यावर कायमस्वरूपी मार्ग निघत नसल्याने शेती कसणे जिकिरीचे काम झाले आहे.
राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या विदर्भात झाल्या सुरूच आहेत. यावर उपाययोजना म्हणून राज्य शासनाने वैध सावकारी कर्जमाफी करण्याची योजना आखली आहे. या निर्णयाची घोषणा नागपूर येथील हिवाळी अधिवेशनामध्ये करण्यात आली होती. आता शासनाने १० एप्रिल रोजी अध्यादेश जारी केला आहे. त्यानुसार वैध सावकाराचे कर्ज त्यावरील व्याजाची रक्कम राज्य सरकार स्वत: भरणार आहे. विदर्भातील साडेतीन लाख शेतकऱ्यांना वैध सावकारी कर्जातून यामुळे मुक्ती मिळणार आहे. जवळ जवळ ३१७ कोटी रुपयांचे कर्ज या शेतकऱ्यांनी वैध सावकारांकडून घेतले आहे. ३० नोव्हेंबर २०१४ पर्यंतचे वैध सावकारी कर्ज आणि ३० जून २०१५ पर्यंतचे त्या कर्जावरील व्याजाची माफी शेतकऱ्यांना मिळणार आहे.
तालुका जिल्हा समिती गठित : प्राप्तअर्ज तालुकास्तरावर आल्यानंतर वैध सावकाराचा अनुज्ञप्ती परवाना, कार्यक्षेत्र, बँक खाते याबाबतची माहिती घेऊन छाननी होणार आहे.
तहसीलदार, उपनिबंधक लेखा परीक्षक यांचा समावेश असलेली तालुका समिती जिल्हास्तरावर अहवाल सादर करणार आहे. जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीमध्ये पोलिस अधीक्षक, जिल्हा उपनिबंधक जिल्हा लेखा परीक्षक हे सदस्य आहेत.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, कर्जमाफी रकमेतही जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर...