आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • 9,800 Crores Litter Water Every Day Wasted In Akola

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अकोल्यात 9,800 कोटी लिटर पाण्याचा दररोज अपव्यय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - एकीकडे पिण्याच्या पाण्यासाठी ओरड होत असताना जिल्ह्यातील महत्त्वाच्या धरणांतून दररोज 9,800 कोटी लिटर पाणी वाया जात असल्याचे चित्र आहे. एवढे पाणी वाहत जात असताना मात्र पाणी अडवण्याचा कुठलाही प्रयत्न शासनाकडून होत नसल्याची खंत आहे. हे पाणी पूर्णा, तापी नदीमार्गे पुढे खान्देशात जात आहे.

जिल्ह्यात काटेपूर्णा, मोर्णा, निगरुणा आणि उमा अशी चार महत्त्वाची धरणे आहेत. या धरणांमध्ये पाणी साठवण्याची पातळी वेगवेगळी असून, या वर्षी पावसाळा चांगला झाल्याने पाणी ओसंडून वाहत आहे. त्यामुळे निकड लक्षात घेता जादा पाणी सोडले जात आहे. हे पाणी योग्य दिशेने एखाद्या कालव्यात किंवा नदीत सोडले तर फायदेशीर ठरू शकते, पण तसे न करता पाणी वाया जात आहे.

पाणी अडवत नाहीत
धरणातील जादा पाणी सोडणे ही गरज आहे. पण, हे पाणी पुढे पूर्णा, तापी या नद्यांना मिळते. विदर्भाचे पाणी खान्देशात जात असताना त्याला अडवण्याचा कुठलाही प्रयत्न जलप्रदाय विभागाकडून होत नाही.
जिल्ह्यातील प्रमुख धरणे
0काटेपूर्णा (मोठे) 0 मोर्णा (मध्यम)
0निगरुणा (मध्यम) 0 उमा (मध्यम)
पर्याय उपलब्ध नाही !
धरणे तुडुंब भरलेली आहेत. वेळीच धरणातील जादा पाणी सोडले नाही, तर अनर्थ होऊ शकतो. हे पाणी थांबवण्याचा किंवा वळवण्याचा कुठलाही पर्याय नाही, ही खंत वाटते. राम पाटील, शाखा अभियंता, पाटबंधारे विभाग.