आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोल्यातील युवक वागेश्वर येथे पूर्णा नदीत बुडाला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तेल्हारा- अकोल्यातील युवक वागेश्वर येथे पूर्णा नदीत बुडाला. तेल्हारा-तालुक्यातील वागेश्वर येथे देवदर्शनासाठी आलेला अकोल्याचा २४ वर्षीय युवक सोमवारी दुपारी येथील पूर्णा नदीत बुडाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी युवकाच्या काकाने तेल्हारा पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
वागेश्वर येथे देवदर्शनासाठी नेहमीच वर्दळ असते. सोमवारी अकोला येथील आकाश किशोर विरोकार (वय २४) हा त्याच्या मित्रांसोबत देवदर्शनासाठी आला होता. दरम्यान, अंघोळीसाठी तो नदीपात्रात उतरला. मात्र, पाण्याचा अंदाज आल्याने तो बुडाला. त्याच्या मित्रांनी परिसरातील नागरिकांनी आकाशचा सर्वत्र शोध घेतला. मात्र, तो आढळला नाही. त्यामुळे त्याचा काका बंडू विरोकार यांनी तेल्हारा पोलिसांत तक्रार दिली असून, पोलिस अधिक तपास करत आहेत. रात्रीपर्यंत शाेधमाेहीम सुरूच हाेती.
बातम्या आणखी आहेत...