आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मूलभूत सुविधांसाठी ‘आप’ देणार लढा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - रस्ते, वीज, पाणी, स्वच्छता यासारख्या मूलभूत सुविधा मिळण्यासाठी आम आदमी पार्टी अर्थात ‘आप’ अकोलेकरांना सोबत घेवून निर्णायक लढा देणार आहे, असा संकल्प पार्टीच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी केला. पार्टीतर्फे अकोल्यात 28 डिसेंबरला सदस्य नोंदणीला महाराणा प्रताप चौकात प्रारंभ करण्यात आला.

‘आप’च्या सदस्य नोंदणीसाठी कार्यकर्त्यांनी मिनी ट्रकवर केवळ बॅनर लावले होते. याठिकाणी कार्यकर्ते नोंदणी करीत होते. नोंदणी करताना युवकांनी प्रतिक्रियाही नोंदविल्या. यामध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेणार्‍या डाबकी रोडवरील एका विद्यार्थ्याचा समावेश होता. ‘सध्याची भ्रष्ट यंत्रणा पाहता शिक्षणानंतर नोकरी किंवा व्यवससाय कसा करावयाचा,’ हा प्रo्न मला सतावत आहे, असे या विद्यार्थ्याने नमूद केले. त्यामुळेच स्वत:च्या आणि देशाच्याही उज्वल भविव्यासाठी भ्रष्टाचाराची किड साफ करणे आवश्यक आहे. त्यासाठीच मी ‘आप’मध्ये आलो असल्याचे विद्यार्थ्याने सांगितले.

याप्रसंगी पार्टीशी सुरुवातीपासून जुळलेले गणेश मानकर, सागर जैन, शिवा पाटील, पप्पू पाडीया, मयूर कोठारी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.