आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्त्रियांचा समानतेचा लढा आजही अखंडपणे सुरूच ,शिकवणीतून घडते आयुष्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - स्त्रियांना५० टक्के आरक्षण देण्यात आले. मात्र, नुसते आरक्षण देऊन प्रश्न सुटलेला नाही. आजही अनेक ठिकाणी त्यांना दुय्यम वागणूक दिली जाते. तरीही आपले अस्तित्व सिद्ध करण्यासाठी स्त्रियांचा लढा अखंडपणे सुरू आहे. त्यांना समानतेची वागणूक मिळावी, म्हणून अविरत संघर्ष सुरूच आहे. स्त्री समानता दिवसानिमित्त अशाच स्वत:चे कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी लढणाऱ्या डॉ. अाशा िमरगे स्वाती काकडे यांची संघर्षमय कहाणी.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षिका स्वाती काकडे यांनी बालपणापासूनच विरोधाला प्रतिकार केला. घरी ितघी बहिणी असल्याने भेदभाव कधी झालाच नाही, उलट महिलांना समानतेची वागणूक मिळावी हीच शिकवण होती. प्रतिकार हा प्रत्येक मुलीने केलाच पाहिजे, हे त्यांचे ठरलेलं उत्तर. पोलिस विभागात येण्यापूर्वी त्यांची नायब तहसीलदार म्हणून निवड झाली. २०११ मध्ये त्यांची अधीक्षिकापदी नियुक्ती झाली. कामावर रुजू झाल्यानंतर मात्र, त्यांना खूप संघर्ष करावा लागला. हे क्षेत्र दारूशी संबंधित असल्यामुळे महिलांनी येथे येऊ नये, असे म्हटले जायचे. त्यामुळे स्वातीताईंना स्वत:ला सिद्ध करण्यासाठी अनेक पुरावे द्यावे लागले. विभागात महिलांची संख्या वाढत असली, तरी प्रत्येकीला तिचे कार्य सिद्ध करावे लागत आहे. अधिकारी म्हणून काम करताना एखादी कारवाई महिला असलो, तरी एकट्या करू शकतो, हे नेहमी दाखवून द्यावे लागते. मुलींना लहानपणापासूनच आपण मुलगी आहोत म्हणून आपण एखादी गोष्ट करायचे, ही शिकवण देणेच चुकीचे आहे. मुलीला समाजात समानतेची वागणूक मिळावी, मुलीला मोठे करण्यात तिच्या आईचे मोठे योगदान असते, असे त्या म्हणाल्या.
अस्तित्व सिद्ध करण्यासाठी करावा लागतोय संघर्ष, डॉ. आशा मिरगे स्वाती काकडेंची अशीही कहाणी
डॉ. आशा मिरगे यांनी लग्नानंतर शिवाजी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम सुरू केले. मुलगा झाल्यानंतर मात्र, जबाबदारीत आणखी वाढ झाली. सुरळीत सुरू असलेला संसार २००४ नंतर पूर्ण बदलला. २००४ मध्ये आशाताईंच्या पतीचे निधन झाले आणि त्यांच्या सासरच्या मंडळींनी त्यांच्याकडे पाठ फिरवली. २००५ मध्ये त्यांनी सुधीर पांडे यांच्यासोबत हॉस्पिटल सुरू केले. सोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काम सुरू होते. राज्य महिला आयोगाचे सदस्यत्व मिळाल्यानंतर तर त्यांचे कार्यक्षेत्र अजून वाढले. सोबत पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस असल्यामुळे पक्षाच्या अपेक्षा होत्या. हे सर्व करताना खरी कसरत होती ती पुरुषी अहंकारापुढे स्वत:ला टिकवण्याची. स्वत:च्या स्वाभिमानाला धक्का लावता प्रेमाने समोरच्याकडून आपले काम कसे काढून घ्यावे, ही कला प्रत्येक स्त्रीला अवगत असावी. पुरुषांच्या बरोबरीने चालताना त्यांच्या तुलनेत दुपटीने शक्ती आणि वेळ खर्च होतो. पण, स्वत:साठी ते करणे अत्यावश्यक आहे, असे त्या म्हणतात.