आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘कावेरीत’ होणार ‘आत्मा’चे स्थानांतरण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाच्या शिकस्त इमारतीत असलेल्या ‘आत्मा’ कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेचे कार्यालय आरडीजी महाविद्यालयाजवळील ‘कावेरी’ या शासकीय जागेत स्थानांतरित होत आहे. दैनिक दिव्य मराठीने 27 ऑगस्टला कृषी विभागाचे कार्यालय शिकस्त इमारतीत अशा आशयाचे वृत्त प्रकाशित केले होते. त्याची दखल प्रशासनाने घेऊन या विभागाला ही जागा उपलब्ध करून दिलेली आहे. कृषी विभागाच्या दोन्ही कार्यालयांच्या स्थानांतरणाला ‘ब्रेेक’ लागला आहे. तांत्रिक कारण समोर करून शासनाच्या एका बड्या अधिकार्‍यांकडून व काँग्रेसच्या जिल्हा पदाधिकार्‍याकडून या स्थानांतरणात अडथळा होत असल्याचे वृत्त ‘दिव्य मराठी’ने प्रकाशित केले होते.

शहरातील श्रावगी प्लॉट भागात असलेले कृषी विभागाचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांचे कार्यालय भाड्याच्या जागेत आहे. याच इमारतीत आत्मा योजनेचे प्रकल्प संचालक कार्यालय आहे. आत्मा योजनेचे प्रकल्प संचालक कृष्णराव देशमुख यांनी ही जागा बदलण्याबाबत दोन ते तीन वेळा सूचना दिल्या आहेत. मात्र, त्यांच्या आदेशाकडेही संबंधित अधिकारी कानाडोळा करत होते. अखेर शासनाने आरडीजी महाविद्यालयासमोरील शासनाची कावेरी या इमारतीची जागा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे आठवडाभरात आत्मा योजनेचे कार्यालय या ठिकाणी स्थांनातरित होत आहे.

काम अधिक प्रभावी
कार्यालयाचे स्थानांतरण झाल्याने आत्मा योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीचे काम आता अधिक प्रभावीपणे करता येईल’’ हिंदुराव चव्हाण, प्रकल्प संचालक, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा