आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोल्यातील विवाहितेवर पणजमध्ये चौघांचा अत्याचार, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोट- नातेवाइ काकडे हातउसने घेतलेले पैसे परत करण्यासाठी निघालेल्या अकाेल्यातील ३५ वर्षीय विवाहितेवर पणज शिवारात दाेन दुचाकीवर अालेल्या चाैघांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना बुधवार, १४ जानेवारी राेजी सायंकाळी घडली. अाराेपींनी पर्समधील चार हजार रुपये घेऊन पसार हाेताना जीवे मारण्याची धमकीही दिल्याची तक्रार पीडित विवाहितेने गुरुवार, १५ जानेवारी राेजी अकाेट ग्रामीण पाेलिस ठाण्यात दिली अाहे. याप्रकरणी चाैघा अनाेळखींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे.
अकाेट तालुक्यातील पणजजवळील गावातील एका नातेवाइकाकडे जाण्यासाठी पीडित विवाहिता काळी-पिवळीने रात्री च्या सुमारास अकाेटमध्ये अाली. तेथून परतवाड्याकडे जाणाऱ्या बसमधून पणज येथे उतरली. तेथून नजीकच असलेल्या नातेवाइकाच्या गावाकडे जाण्यासाठी गाडीची एका व्यक्तीकडे विचारणा केली. मात्र, त्या व्यक्तीने अाता गाडी नसल्याचे पीडितेला सांगितले. त्यामुळे पीडित महिला चालतच निघाली. यादरम्यान दाेन दुचाकींवर ३५ ते ४० वयोगटातील चार अनाेळखी व्यक्ती तिच्याजवळ अाल्या.त्यांनी केस धरले. अारडाअाेरड करत असताना एकाने ताेंड दाबले जबरदस्तीने जवळच्या शेतात नेऊन बलात्कार केला. पर्समधील चार हजार रुपयांबाबत त्यांना विचारणा केली असता त्यांनी, ‘पैसे घेतले नाहीत, पुन्हा या रस्त्याने दिसलीस तर जीवे मारून टाकू’, अशी धमकी देऊन पसार झाले. त्यांच्या दुचाकीवर एमएच-२७-६३०८ एमएच-२७-४३१६ असे नंबर हाेते. ते माझ्या माेबाइलमध्ये टिपून घेतले. दाेन्हीपैकी एक दुचाकी काळी, दुसरी लाल हाेती, असे पीडित महिलेने तक्रारीत म्हटले अाहे. घटनेनंतर पीडित महिलेची प्रकृती बिघडली. त्या अवस्थेतच ती नातेवाइकाकडे गेली. तेथे घटना सांगितली. गुरुवारी नातेवाईक महिलेसह अकाेटचे ग्रामीण पाेलिस ठाण्यात अनाेळखी चाैघांविरुद्ध बलात्कार करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार दिली. याप्रकरणी कलम ३७६ (ड), ५०६, ३४ नुसार गुन्हा दाखल केला अाहे. तपास ठाणेदार किशाेर शेळके करत अाहेत.

त्यांनीकेस धरले. अारडाअाेरड करत असताना एकाने ताेंड दाबले जबरदस्तीने जवळच्या शेतात नेऊन बलात्कार केला. जवळच्या पर्समधील चार हजार रुपयांबाबत त्यांना विचारणा केली असता त्यांनी, ‘पैसे घेतले नाहीत, पुन्हा या रस्त्याने दिसलीस तर जीवे मारून टाकू’, अशी धमकी देऊन पसार झाले. त्यांच्या दुचाकीवर एमएच-२७-६३०८ एमएच-२७-४३१६ असे नंबर हाेते. ते माझ्या माेबाइलमध्ये टिपून घेतले. दाेन्हीपैकी एका दुचाकीचा रंग काळा दुसरीचा लाल हाेता, असे पीडित महिलेने तक्रारीत म्हटले अाहे. घटनेनंतर पीडित महिलेची प्रकृती बिघडली. त्या अवस्थेतच ती नातेवाइकाकडे गेली. तेथे घटना सांगितली. त्यानंतर गुरुवारी नातेवाईक महिलेसह अकाेटचे ग्रामीण पाेलिस ठाणे गाठून अनाेळखी चाैघांविरुद्ध बलात्कार करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार दिली. याप्रकरणी कलम ३७६ (ड), ५०६, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. तपास ठाणेदार किशाेर शेळके करत अाहेत.

शाेधासाठी पथके रवाना
अाराेपींच्याशाेधासाठी ग्रामीण पाेलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांचे पथक नियुक्त केले असून, ते तपासासाठी पणज, वडाळी देशमुख परिसरात रवाना झाले अाहेत. दुचाकीच्या क्रमांकावरून अाराेपी लवकरच ताब्यात घेतले जातील. किशाेरशेळके, ठाणेदार,अकाेट ग्रामीण पाेलिस ठाणे.