आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Accident News In Marathi, Appe And Auto Ricksha Accident Issue At Akola, Divya Marathi

मेटॅडोर- अँपेची धडक; एक जखमी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- उसाच्या अँपे ऑटोरिक्षाला मेटॅडोरने धडक दिल्याने अँपेरिक्षा, मेटॅडोरचालकासह एक जण किरकोळ जखमी झाला. हा शुक्रवार, 28 मार्चला दुपारी 3 वाजताच्या सुमारास आयकॉन हॉस्पिटलजवळ महाराष्ट्र शाळेसमोर झाला.

उसाने भरलेला अँपे क्रमांक एमएच 28 एच 6909 हा मोठी उमरी येथून जठारपेठकडे चालला होता. महाराष्ट्र कन्या शाळेसमोर डॉ. महाजन यांच्या घरासमोर शहराकडे जाणार्‍या मेटॅडोरने अँपेला जोरदार धडक दिली. मेटॅडोरच्या धडके मुळे अँपे डॉ. महाजन यांच्या घराच्या भिंतीला जाऊन धडकला. अँपेचा चालक कैलास भीमराव रोठे, त्याच्यासोबत असलेला अन्सार खाँ हसन खाँ हे दोघेजण, तर मेटॅडोरचा चालक संतोष इंगळे हासुद्धा जखमी झाला आहे.