आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चेतन, ओम इसापुरेचा अपघातामध्ये करुण अंत ओम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोट - खामगाव आगाराच्या नाशिकला जाणार्‍या बसला शनिवारी दुपारी मालेगावजवळ अपघात झाला. या रस्त्यावर राहुड घाट चढताना अनियंत्रित टँकरची धडक लागल्याने पाच जण ठार झाले होते. या अपघातात अकोट तालुक्यातील पाटसूल येथील चिमुकल्या दोन मुलांचा करुण अंत झाला. त्यात त्यांचे नातेवाईक जखमी झाले आहेत.
चांदवडनजीक मुंबई-आग्रा महामार्गावर राहुड घाटाच्या पायथ्याशी दुधाचा टॅँकर, भारत गॅस कंपनीचा टॅँकर व एसटी महामंडळाची बस यांच्यात झालेल्या तिहेरी अपघातात पाच जण ठार, तर 19 गंभीर जखमी झाले. पाटसूल येथील मोहन श्रीकृष्ण इसापुरे (40) हे नाशिक जिल्ह्यातील शहापूर येथे राज्य परिवहन महामंडळात चालक म्हणून कार्यरत आहेत. ठार झालेल्या मुलांमध्ये चेतन विनायक इसापुरे व ओम मोहन इसापुरे यांचा समावेश आहे. दोघांचे वय चार वर्षांचे आहे.
चेतन हा देवरी येथील स्वामी विवेकानंद कॉन्व्हेंटमध्ये नर्सरीत शिकत होता, तर ओम हा मुंबई येथे नर्सरीत शिकत होता. उन्हाळ्याच्या सुट्या लागल्यामुळे ते गावाकडे आले होते. पाटसूल येथून ते नाशिककडे निघाले होते. त्यांच्यासोबत असलेले श्रीकृष्ण इसापुरे (65), मोहन श्रीकृष्ण इसापुरे (40) योगिता मोहन इसापुरे (35) हे जखमी झाले आहेत.